Brightcom Group Share Price | ब्राइटकॉम ग्रुप शेअर आयुष्य ब्राईट करतोय, 75% स्वस्त झाल्यानंतर तुफान तेजीत, रोज अप्पर सर्किट, कारण काय?
Highlights:
- Brightcom Group Share Price
- ब्राइटकॉम ग्रुप शेअरची कामगिरी
- गुंतवणूकीवर परतावा
Brightcom Group Share Price | ब्राइटकॉम ग्रुप या डिजिटल मार्केटिंग कंपनीच्या शेअर्समध्ये अद्भूत तेजी पाहायला मिळत आहे. मार्केट रेग्युलेटर सेबीने ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या प्रवर्तकांना 40 लाख रुपयांचा दंड आकारला असूनही या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट तोडत आहेत.
गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 28.86 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज शुक्रवार दिनांक 16 जून 2023 रोजी ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 4.89 टक्के वाढीसह 30.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
ब्राइटकॉम ग्रुप शेअरची कामगिरी
मागील 11 पैकी 10 ट्रेडिंग सेशन ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट तोडला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 57.70 रुपये होती. तर मागील दीड महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने लोकांना 211 टक्के परतावा कमावून दिला आहे. ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअर्समध्ये मागील दीड महिन्यापासून कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. 28 एप्रिल 2023 रोजी ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 9.27 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 15 जून 2023 रोजी ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 28.86 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
गुंतवणूकीवर परतावा
मागील दीड महिन्याच्या कालावधीत ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअर्सने लोकांना 211 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 28 एप्रिल 2023 रोजी ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 3.11 लाख रुपये झाले असते.
नुकताच सेबीने ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या प्रवर्तकांवर मोठा दंड ठोठावला आहे. बाजार नियामक सेबीने नियामक स्टॉक मार्केट नियमांचे उल्लंघन केल्याने ब्राइटकॉम ग्रुपच्या गीता कंचर्ला यांना 12 लाख रुपये, विजय कुमार कंचर्ला एचयूएफ, विजय कुमार कंचर्ला, एचयूएफचे कर्ता, कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एम सुरेश कुमार रेड्डी यांना प्रत्येकी 6 लाख रुपये दंड लगावला आहे. यासोबत एसव्ही राज्यलक्ष्मी रेड्डी आणि ब्राइटकॉम ग्रुप लिमिटेड कंपनीवर सेबीने प्रत्येकी 5 लाख रुपये दंड लावला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Brightcom Group Share Price today on 16 June 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell?
- Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल
- Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर मजबूत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हलसहित टार्गेट प्राईस जाहीर
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे टॉप 5 शेअर्स मालामाल करणार, अल्पावधीत तगडा परतावा मिळेल
- RVNL Share Price | PSU स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सुसाट धावणार
- Numerology Horoscope | 10 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Infosys Share Price | हलक्यात घेऊ नका! Infosys, TCS, Wipro सहित हे 7 शेअर्स मालामाल करणार, हाय ट्रेडिंग व्हॉल्यूम
- HAL Share Vs BEL Share Price | PSU HAL आणि BEL शेअर्स दणादण परतावा देणार, अल्पावधीत 30% कमाई करा
- Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल
- Tata Power Share Price | चिंता वाढली! टाटा पॉवर शेअर्स 45 टक्क्याने घसरणार? स्टॉक Hold करावा की Sell?