21 May 2024 10:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Demat Account | शेअर्स गुंतवणूकदारांसाठी अलर्ट, ट्रान्झॅक्शन चार्जेससहित डीमॅट खात्याशी संबंधित नियमात बदल ICICI Mutual Fund | पगारदारांना मालामाल बनवणारी म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 35 लाख रुपये परतावा Numerology Horoscope | 21 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 21 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल?
x

Ramkrishna Forgings Share Price | रामकृष्ण फोर्जिंग्ज शेअरमध्ये गुंतवणूक करण्याची सुवर्णसंधी, शेअर पुढील काळात तेजीत येणार

Ramkrishna Forgings Share Price

Ramkrishna Forgings Share Price | रामकृष्ण फोर्जिंग्ज कंपनीच्या शेअर्समध्ये एका दिवसात 7 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. त्यानंतर या कंपनीच्या शेअरने इंट्रा-डे ट्रेडमध्ये 440 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती. रामकृष्ण फोर्जिंग्ज कंपनीच्या शेअर्समध्ये वाढीचे प्रमुख कारण म्हणजे, युरोप आणि भारतीय रेल्वे मंत्रालयाकडून कंपनीला मोठी वर्क ऑर्डर मिळाली आहे. ही बातमी येताच गुंतवणूकदारांनी रामकृष्ण फोर्जिंग्ज कंपनीचे शेअर्स खरेदी करायला सुरुवात केली.

ऑर्डर तपशील
रामकृष्ण फोर्जिंग्स कंपनीला युरोपमधून 4.5 दशलक्ष युरोची वर्क ऑर्डर प्राप्त झाली आहे. तर या कंपनीला ही ऑर्डर पुढील 2 वर्षात पूर्ण करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. रामकृष्ण फोर्जिंग्स कंपनीला या वर्क ऑर्डर अंतर्गत रेल्वेचे डबे बनवायचे काम देण्यात आले आहे.

रामकृष्ण फोर्जिंग्ज कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, युरोप व्यतिरिक्त रामकृष्ण फोर्जिंग्स कंपनीला भारतीय रेल्वे मंत्रालयाकडून देखील वंदे भारत ट्रेनची एक मोठी ऑर्डर देण्यात आली आहे. या ऑर्डरमध्ये Titagarh Rail Systems Ltd देखील भागीदार म्हणून काम करणार आहे. या वर्क ऑर्डरचे मूल्य 12,226.50 कोटी रुपये आहे.

मागील एका वर्षात रामकृष्ण फोर्जिंग्ज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 158 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2023 मध्ये आतापर्यंत रामकृष्ण फोर्जिंग्ज कंपनीच्या शेअरची किंमत 57 टक्क्यांनी वाढली आहे. तर गुंतवणूकदारांसाठी चांगली गोष्ट म्हणजे मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने लोकांना 22 टक्के नफा मिळवून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 145.50 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Ramkrishna Forgings Share Price today on 17 June 2023.

हॅशटॅग्स

Ramkrishna Forgings Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x