17 May 2024 2:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | अबब! जबरदस्त म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 9.57 कोटी रुपये परतावा दिला Gold Rate Today | टेन्शन वाढलं! आज सोन्याचा भाव अजून महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या My EPF Money | पगारदारांनो! तुमच्या खात्यातही पैसे जमा झाले असतील तर पटापट तपासून घ्या, नियम बदलला Shukra Rashi Parivartan | 'या' 3 नशीबवान राशीत तुमची राशी आहे का? शुक्र राशी परिवर्तन ठरणार अत्यंत भाग्यशाली SBI Mutual Fund | पगारदारांनो! या खास योजना तुम्हाला अल्पावधीत 22 लाख रुपयेपर्यंत परतावा देतील, यादी सेव्ह करा Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली
x

IIFL Securities Share Price | मल्टिबॅगेर शेअर IIFL सिक्युरिटीज कंपनीला मोठा दिलासा, शेअर्स खरेदीला जोरदार सुरुवात, फायदा घेणार?

IIFL Securities Share Price

IIFL Securities Share Price | आयआयएफएल सिक्युरिटीज कंपनीच्या शेअरमध्ये आज मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळत आहे. स्टॉकमध्ये तेजीचे कारण म्हणजे, आयआयएफएल सिक्युरिटीज कंपनीला मंगळवारी मोठा दिलासा मिळाला आहे. सिक्युरिटीज अपिलेट ट्रिब्यूनलने मंगळवारी सेबीच्या आयआयएफएल सिक्युरिटीज विरुद्धच्या आदेशाला स्थगिती दिली आहे.

सेबीने 20 जून 2023 रोजी एक आदेश जारी करून आयआयएफएल सिक्युरिटीज या ब्रोकरेज हाऊसला दोन वर्षांसाठी नवीन ग्राहक जोडण्यास प्रतिबंध केला होता. SAT कडून मोठा दिलासा मिळाल्यानंतर मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआयएफएल सिक्युरिटीज कंपनीच्या शेअरने 6 टक्के उसळी घेतली, आणि शेअर 65.79 रुपये किमतीवर पोहचले होते. आज बुधवार दिनांक 28 जून 2023 रोजी आयआयएफएल सिक्युरिटीज कंपनीचे शेअर्स 3.40 टक्के वाढीसह 62.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआयएफएल सिक्युरिटीज कंपनीचे शेअर्स 4.4 टक्क्यांच्या वाढीसह 62.98 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आयआयएफएल सिक्युरिटीज कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 79.65 रुपये होती. तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 48.23 रुपये होती. सेबीकडून आयआयएफएल सिक्युरिटीज कंपनीला नवीन क्लायंट न जोडण्याचा आदेश देण्यात आला होता.

सेबीने आयआयएफएल सिक्युरिटीज कंपनीवर आचारसंहितेच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत नवीन ग्राहक जोडण्यास बंदी घातली होती. ही माहिती समोर येताच आयआयएफएल सिक्युरिटीज कंपनीच्या शेअरची घसरायला सुरुवात झाली.

आयआयएफएल सिक्युरिटीज कंपनीने तातडीने सेबीच्या आदेशाविरुद्ध न्यायाधिकरणात दाद मागितली. आणि आता आयआयएफएल सिक्युरिटीज कंपनीला मोठा दिलासा मिळाला आहे. मार्च 2023 ला संपलेल्या तिमाहीत आयआयएफएल सिक्युरिटीज कंपनीने 342.71 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. यात कंपनीने 121.43 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| IIFL Securities Share Price today on 28 June 2023

हॅशटॅग्स

IIFL Securities Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x