19 May 2024 2:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Mufin Green Share Price | मुफिन ग्रीन फायनान्स शेअरच्या गुंतवणूकदारांना फ्री बोनस शेअर्स मिळणार, रेकॉर्ड तारीख पाहून फायदा घ्या

Mufin Green Finance Share Price

Mufin Green Share Price | मुफिन ग्रीन फायनान्स लिमिटेड कंपनीच्या शेअर धारकांसाठी एक खुश खबर आली आहे. या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. मुफिन ग्रीन फायनान्स लिमिटेड कंपनीने आपल्या पात्र गुंतवणुकदारांना 2 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच प्रत्येक एक शेअरवर 2 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. बुधवार दिनांक 28 जून 2023 रोजी मुफिन ग्रीन फायनान्स कंपनीचे शेअर्स 3.71 टक्के वाढीसह 135.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Mufin Green Finance Share Price)

मागील पाच दिवसांत मुफिन ग्रीन फायनान्स कंपनीचे शेअर्स 2.73 टक्के वाढले आहे. तर YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या.गुंतवणुकदारांना 12.68 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 135.12 टक्के मल्टीबॅगर नफा कमावून दिला आहे.

या काळात शेअरची किंमत 55.93 रुपयेवरून वाढून 131.50 रुपयेवर पोहोचली आहे. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 1,287.13 टक्के नफा कमावून दिला आहे. या काळात शेअरची किंमत 9.48 रुपयेवरून वाढून सध्याच्या किंमतीवर पोहोचली आहे.

मुफिन ग्रीन फायनान्स कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 51.50 रुपये होती. तर उच्चांक किंमत पातळी 143.40 रुपये होती. मुफिन ग्रीन फायनान्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 673.44 कोटी रुपये आहे. सेबीच्या नियमांनुसार मुफिन ग्रीन फायनान्स कंपनीने आपल्या शेअर धारकांना 2 : 1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. शुक्रवार दिनांक 07 जुलै 2023 हा दिवस बोनस शेअर्स वाटप करण्यासाठी रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित करण्यात आला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Mufin Green Finance Share Price today on 29 June 2023.

हॅशटॅग्स

Mufin Green Finance Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x