20 May 2024 3:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

Maharashtra Scooters Share Price | आज स्टॉक मार्केटमध्ये नजरा महाराष्ट्र स्कूटर्स शेअरवर, नेमकं कारण काय? स्टॉक तपशील जाणून घ्या

Maharashtra Scooters Share Price

Maharashtra Scooters Share Price | महाराष्ट्र स्कूटर्स या मिडकॅप कंपनीचे शेअर्स आज फोकसमध्ये आहेत. कारण कंपनीचे शेअर्स उद्या म्हणजेच 1 जुलै रोजी एक्स डिव्हिडंड म्हणून ट्रेड करणार आहेत. बुधवारी महाराष्ट्र स्कूटर्स कंपनीचे शेअर्स 5460 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज शुक्रवार दिनांक 30 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.76 टक्के वाढीसह 5,476.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

लाभांश तपशील

महाराष्ट्र स्कूटर्स कंपनीने नुकताच आपल्या गुंतवणूकदारांना 60 रुपये प्रति शेअर म्हणजेच दर्शनी मूल्यावर 600 टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. यासाठी शुक्रवार दिनांक 30 जून 2023 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून जाहीर करण्यात आला होता. मार्च 2023 तिमाहीच्या आर्थिक निकालावरून असे समजते की, Q4FY23 मध्ये महाराष्ट्र स्कूटर्स कंपनीने 9.24 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. Q4FY22 मध्ये कंपनीने 10.37 कोटी रुपये महसूल संकलित केला होता, जो मार्च 2023 तिमाहीत 10.90 टक्के घटला आहे.

कंपनीची आर्थिक कामगिरी

मार्च 2023 ला संपलेल्या तिमाहीत महाराष्ट्र स्कूटर्स कंपनीने 8.02 कोटी रुपये निव्वळ खर्च नोंदवला होता. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ खर्च 8.18 कोटी रुपये नोंदवला गेला होता. Q4FY23 मध्ये महाराष्ट्र स्कूटर्स कंपनीने 0.82 कोटी निव्वळ नफा कमावला होता. तर Q4FY22 मध्ये कंपनीने 1.57 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मार्च 2023 मध्ये संपलेल्या तिमाहीत महाराष्ट्र स्कूटर्स स्टॉकचा EPS 0.72 टक्के नोंदवला गेला होता. तर मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीचा EPS 1.37 वर होता.

कंपनी बद्दल थोडक्यात

महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेड ही बजाज होल्डिंग्ज अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड कंपनीची उपकंपनी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्र स्कूटर्स स्टॉक बीएसई आणि NSE वर सूचीबद्ध आहे. कंपनीच्या सध्याच्या मॅन्युफॅक्चरिंग ऑपरेशन्समध्ये प्रेशर डाय कास्टिंग डाय, कास्टिंग, जिग्स आणि फिक्स्चर्स, आणि दुचाकी आणि तीन चाकी उद्योगांचे पार्ट याचा समावेश आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Maharashtra Scooters Share Price today on 30 June 2023.

हॅशटॅग्स

Maharashtra Scooters Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x