16 May 2024 11:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | पगारातून बचत करा! SBI म्युच्युअल फंडाच्या 'या' योजना मालामाल करतील, बचत अवघी रु. 500 Post Office Scheme | मोठी कमाई करा! या योजनेत 500 रुपयांची बचत सुरु करा, मिळेल 9,76,370 रुपये परतावा Income Tax Returns | पगारदारांनो! तुमचा पगार इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये येत नसेल तरी ITR करा, मिळतील 'हे' फायदे Nippon India Mutual Fund | बँक FD पेक्षा नोकरदार वर्ग या फंडात पैसे गुंतवतो, लो-रिस्क आणि फायदा मोठा मिळतोय Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय
x

Mankind Pharma Share Price | मॅनकाइंड फार्मा शेअरने अल्पावधीत मजबूत परतावा दिला, गुंतवणूक करून फायदा घेण्यासाठी स्टॉक तपशील वाचा

Mankind Pharma Share Price

Mankind Pharma Share Price | मॅनकाइंड फार्मा या फार्मा कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना भरघोस नफा मिळवून दिला आहे. IPO लाँच झाल्याच्या अवघ्या 2 महिन्यांच्या आत मॅनकाइंड फार्मा शेअर्सची किंमत 55 टक्के वाढली आहे. शुक्रवार दिनांक 30 जून 2023 रोजी मॅनकाइंड फार्मा कंपनीचे शेअर्स 1719.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मॅनकाइंड फार्मा स्टॉक बाबत शेअर बाजारातील तज्ञ उत्साही पाहायला मिळत आहेत. तज्ञांच्या मते मॅनकाइंड फार्मा स्टॉक पुढील काळात आणखी वाढू शकतो. (Mankind Pharma)

IPO ची कामगिरी

25 एप्रिल 2023 रोजी मॅनकाइंड फार्मा कंपनीचे शेअर्स गुंतवणुकीसाठी खुले करण्यात आले होते. 27 एप्रिल 2023 पर्यंत हा IPO ओपन होता. मॅनकाइंड फार्मा कंपनीच्या आयपीओमध्ये शेअरची किंमत बँड 1026 ते 1080 रुपये निश्चित करण्यात आली होती. IPO मध्ये मॅनकाइंड फार्मा कंपनीचे शेअर्स 1080 रुपये किमतीवर वाटप करण्यात आले होते.

9 मे 2023 रोजी मॅनकाइंड फार्मा कंपनीचे शेअर्स 1300 रुपये किमतीवर सूचीबद्ध करण्यात आले होते. 30 जून 2023 रोजी मॅनकाइंड फार्मा कंपनीचे शेअर्स 1719.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. IPO किमतीच्या तुलनेत शेअरची किंमत आतपर्यंत 55 टक्के वाढली आहे.

स्टॉकबाबत तज्ञांचे मत

मॅनकाइंड फार्मा कंपनीच्या स्टॉकवर तज्ञांनी 1830 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. ब्रोकरेज हाऊस जेफरीजने मॅनकाइंड फार्मा स्टॉकवर ‘होल्ड’ रेटिंग देऊन 1830 रुपये टार्गेट किंमत जाहीर केली आहे. कंपनीच्या शेअर्सनी सातत्याने शेअर बाजारात उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 26 टक्के परतावा कमावून दिला आहे. मॅनकाइंड फार्मा कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1768.05 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 1240.75 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Mankind Pharma Share Price today on 01 July 2023.

हॅशटॅग्स

#Mankind Pharma Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x