13 May 2024 2:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | रॉकेट स्पीडने परतावा देणारे टॉप 10 शेअर्स, प्रतिदिन 5 ते 10 टक्के परतावा मिळतोय IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागून मिळेल 151% परतावा, संधी सोडू नका Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, अल्पावधीत तगडा परतावा मिळेल Alok Industries Share Price | चिंता वाढली! शेअर 39 रुपयांवरून घसरून 25 रुपयांवर आला, स्टॉक Hold करावा की Sell? Income Tax Refund | नोकरदारांनो! तुम्हाला ITR रिफंड कधी मिळणार? पैसे लवकर मिळतील, महत्वाची माहिती जाणून घ्या Adani Enterprises Share Price | मल्टीबॅगर अदानी एंटरप्रायझेस स्टॉक सपोर्ट लेव्हल वर टिकणार? पुढची टार्गेट प्राईस? Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकमध्ये जोरदार घसरण, स्टॉक Hold करावा की Sell? तज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या
x

Samvardhana Motherson Share Price | काय सांगता? संवर्धन मदरसन इंटरनॅशनल शेअरने 114775% परतावा दिला, 1 लाखाचे झाले 5 कोटी

Samvardhana Motherson Share Price

Samvardhana Motherson Share Price | संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड या ऑटो कॉम्पोनंट निर्माता कंपनीचे शेअर्स आज हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांच्या वाढीसह 91.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या शेअर्समध्ये इतकी मोठी खरेदी एका डीलनंतर पाहायला मिळत आहे. (Samvardhana Motherson Share Price)

मंगळवार दिनांक 4 जुलै 2023 रोजी SMRP BV च्या उपकंपनीद्वारे Yachiyo Industry Co. Ltd. मधील 81 टक्के भाग भांडवल खरेदी केले जाणार आहे. याचिओ इंडस्ट्री ही Honda Motor ची टोक्यो स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध असलेली उपकंपनी आहे. आज संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.77 टक्के वाढीसह 91.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

याचिओ इंडस्ट्री कंपनीमधील धोरणात्मक भागीदारीमध्ये संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीचा 81 टक्के वाटा असेल. आणि उर्वरित 19 टक्के भाग भांडवल Honda Motor कंपनी धारण करणार आहे. संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीचे मार्च 2023 तिमाही निकाल जाहीर करण्यात आले होते.

ऑटोमोटिव्ह पार्टस निर्माता कंपनी संवर्धन मदरसन इंटरनॅशनलने मार्च 2023 तिमाहीत 438 टक्क्यांच्या वाढीसह 654 कोटी रुपये निव्वळ नाव कमावला आहे. मार्च तिमाहीत कंपनीच्या PAT मध्ये 44 टक्क्यांची वाढ झाली आहे. संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीने मार्च 2023 तिमाहीत आतापर्यंतचा सर्वाधिक तिमाही आणि वार्षिक महसूल संकलित केला आहे.

आज संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 91.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 14.30 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 22.05 टक्के नफा कमावून दिला आहे.

मागील एका वर्षात संवर्धन मदरसन कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 18.12 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरने सुरुवातीपासून आतापर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना 114,775.00 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची किंमत 17 पैशांवरून वाढून सध्याच्या किंमतीवर पोहोचली आहे. ज्या लोकांनी शेअरची किंमत 0.17 पैसे असताना एक लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 5 कोटी झाले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Samvardhana Motherson Share Price today on 06 July 2023.

हॅशटॅग्स

Samvardhana Motherson Share Price(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x