19 May 2024 12:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Star Housing Share Price | डिव्हीडंड जाहीर होताच स्टार हाउसिंग फायनान्स शेअरची खरेदी वाढली, गुंतवणुकीसाठी स्टॉक डिटेल्स जाणून घ्या

Star Housing Share Price

Star Housing Share Price | स्टार हाउसिंग फायनान्स लिमिटेड या शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या स्मॉल कॅप कंपनीने आपले 2023-24 मधील Q1 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. स्टार हाउसिंग फायनान्स या स्मॉल कॅप कंपनीने आपल्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेत म्हणजेच AUM मध्ये 134 टक्के वाढ साध्य केली आहे.

वार्षिक आधारावर स्टार हाउसिंग फायनान्स कंपनीच्या कमाईमध्ये 99 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. स्टार हाउसिंग फायनान्स कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या शेअरधारकांना 0.05 पैसे प्रति शेअर अंतिम लाभांश वाटप करण्याचा ही विचार केला आहे.

सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्टार हाउसिंग फायनान्स कंपनीचे शेअर्स 5.41 टक्के वाढीसह 62.49 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज मंगळवार दिनांक 18 जुलै 2023 रोजी स्टार हाउसिंग फायनान्स कंपनीचे शेअर्स 0.70 टक्के घसरणीसह 61.06 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

स्टार हाउसिंग फायनान्स कंपनीने वार्षिक सर्वसाधारण बैठकीत शेअर धारकांच्या मान्यतेच्या अधीन राहून कंपनीच्या कर्ज उभारणीच्या मर्यादेत 700 कोटी रुपयेपर्यंत वाढ केली आहे. 100 कोटी रुपये मुल्यापेक्षा अधिक रकमेच्या NCDs च्या मुद्द्याला देखील संचालक मंडळाने खाजगी प्लेसमेंटच्या माध्यमातून मजुरी दिली आहे.

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्टार हाउसिंग फायनान्स कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली होती. कंपनीने आर्थिक निकाल जाहीर करताच स्टॉक तेजीत आला होता. स्टार हाऊसिंग फायनान्स कंपनीचे शेअर्स आज किंचित घसरणीसह ओपन झाले आहेत. काल हा स्टॉक 61.70 रुपये या इंट्राडे उच्चांक किमतीवर पोहचला होता. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. आज स्टॉक मध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Star Housing Share Price today on 18 July 2023.

हॅशटॅग्स

Star Housing Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x