17 May 2024 9:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका
x

Sarda Energy Share Price | गुंतवणुकीची सुवर्ण संधी सोडू नका, मल्टिबॅगर सारदा एनर्जी अँड मिनरल्स शेअर तेजीत, तीन वर्षांत 947% परतावा दिला

Sarda Energy Share Price

Sarda Energy Share Price | सारदा एनर्जी अँड मिनरल्स कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुसाट तेजीत धावत होते. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सारदा एनर्जी कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 1749.85 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

सारदा एनर्जी अँड मिनरल्स कंपनीने 27 मे 2023 रोजी स्टॉक स्प्लिटचा प्रस्ताव मंजूर केला होता. तेव्हापासून आतापर्यंत या कंपनीच्या शेअरची किंमत 54 टक्के वाढली आहे. सारदा एनर्जी अँड मिनरल्स ही कंपनी शारदा समूहाचा भाग आहे. ही कंपनी पोलाद, आणि वीज निर्मिती उद्योगात गुंतलेली आहे. आज बुधवार दिनांक 19 जुलै 2023 रोजी सारदा एनर्जी अँड मिनरल्स कंपनीचे शेअर्स 2.01 टक्के वाढीसह 1,763.05 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

रेकॉर्ड तारीख तपशील :

सारदा एनर्जी अँड मिनरल्स स्टील कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कंपनीने स्टॉक विभाजनासाठी शुक्रवार दिनांक 4 ऑगस्ट 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे. सारदा एनर्जी कंपनी आपले शेअर्स 10 तुकड्यांमध्ये विभाजित करणार आहे. 29 सप्टेंबर 2022 रोजी सारदा एनर्जी अँड मिनरल्स स्टील कंपनीचे शेअर्स 793.28 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 97.97 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 947 टक्के परतावा कमावून दिला आहे.

सारदा एनर्जी अँड मिनरल्स ही कंपनी वायर रॉड उत्पादनाचा व्यवसाय करते. याशिवाय, ही कंपनी औष्णिक उर्जा आणि जलविद्युत निर्मितीची कामे देखील करते. 15 मार्च 2023 रोजी सारदा एनर्जी अँड मिनरल्स कंपनीची वायर रॉड मिलची क्षमता 180,000MT वरून वाढून 250,000 MT पर्यंत वाढली आहे.

याव्यतिरिक्त 15 डिसेंबर 2022 रोजी कंपनीने विझाग सुविधेवर 36 MVA ची नवीन क्षमता यशस्वीरित्या साध्य केली आहे. याशिवाय छत्तीसगडमधील रेहर नदीकाठी सारदा एनर्जी अँड मिनरल्स कंपनीने 24.9 मेगावॅट क्षमतेचा प्लांट उभारण्याचे काम सुरू केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sarda Energy Share Price today on 19 July 2023.

हॅशटॅग्स

Sarda Energy Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x