18 May 2024 4:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये ब्रेकआउटचे संकेत, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राइस, किती फायदा?
x

Titan Share Price | टायटन स्टॉकमध्ये रेखा झुनझुनवाला यांनी आणखी पैसे गुंतवले, गुंतवणूक वाढवण्याचं नेमकं कारण काय?

Titan Share Price

Titan Share Price | शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी टाटा समूहाचा भाग असलेल्या टायटन कंपनीच्या शेअरमध्ये आणखी गुंतवणूक केली आहे. रेखा झुनझुनवाला यांनी टायटन कंपनीचे आणखी 650000 शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. जून 2023 च्या तिमाहीत त्यांनी टायटन कंपनीचे 650000 शेअर्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये जोडले आहेत. (Titan Company Share Price)

टायटन कंपनीचे शेअर्स राकेश झुनझुनवाला यांचे फेवरेट होते. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टायटन कंपनीचे शेअर्स 2995.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज बुधवार दिनांक 19 जुलै 2023 रोजी टायटन कंपनीचे शेअर्स 0.047 टक्के घसरणीसह 2,995.05 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये आता टायटन कंपनीचे एकूण 4.78 कोटी शेअर्स आहेत. म्हणजेच रेखा झुनझुनवाला यांनी टायटन कंपनीचे एकूण 5.36 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. रेखा झुनझुनवाला यांनी जून 2023 तिमाहीमध्ये टायटन कंपनीचे अतिरीक्त 650000 शेअर्स खरेदी केले होते. रेखा झुनझुनवाला यांच्याकडे मार्च 2023 च्या तिमाहीपर्यंत टायटन कंपनीचे 46945970 शेअर्स होते. जे एकूण भाग भांडवलाच्या 5.29 टक्के होते.

एलआयसी आणि अनेक म्युच्युअल फंडानी आपली गुंतवणूक टायटन कंपनीमधून कमी केली आहे. फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स यांनी जून 2023 तिमाहीत टायटन स्टॉकमध्ये गुंतवणूक वाढवली आहे. परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी जून 2023 च्या तिमाहीत त्यांचा हिस्सा 17.79 टक्केपर्यंत वाढवला आहे.

मार्च 2023 तिमाहीत त्यांचा वाटा 16.86 टक्के होता. दरम्यान देशांतर्गत म्युच्युअल फंड आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ यांनी टायटन कंपनीचे शेअर विकले आहेत. जून 2023 च्या तिमाहीत म्युच्युअल फंडांकडे टायटन कंपनीचे 5.52 टक्के भाग भांडवल आहेत. जे मार्च 2023 तिमाहीत 5.78 टक्के होते. त्याच वेळी जून 2023 मध्ये एलआयसी कंपनीकडे टायटनचे 1.77 टक्के भाग भांडवल आहे, जे मार्च 2023 तिमाहीत 2.09 टक्के होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Titan Share Price today on 19 July 2023.

हॅशटॅग्स

#Titan Share Price(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x