18 May 2024 9:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Aurionpro Share Price | मालामाल शेअर! ओरियनप्रो सोल्युशन्स शेअरने तीन वर्षात 1800 टक्के परतावा दिला, एक लाखाचे झाले 19 लाख

Aurionpro Share Price

Aurionpro Share Price | ओरियनप्रो सोल्युशन्स कंपनीच्या शेअर्सने मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 1,800 टक्के नफा कमावून दिला आहे. 17 जुलै 2020 रोजी ओरियनप्रो सोल्युशन्स कंपनीचे शेअर्स 51 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर सोमवारी 17 जुलै 2023 रोजी ओरियनप्रो सोल्युशन्स कंपनीचे शेअर्स 971.35 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

या कालावधीत ओरियनप्रो सोल्युशन्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1,804 टक्के नफा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी तीन वर्षांपूर्वी ओरियनप्रो सोल्युशन्स कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 19.04 लाख रुपये आहे. आज बुधवार दिनांक 19 जुलै 2023 रोजी ओरियनप्रो सोल्युशन्स कंपनीचे शेअर्स 0.63 टक्के घसरणीसह 980.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

ओरियनप्रो सोल्युशन्स कंपनीचे शेअर्स रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्सवर 57.1 अंकावर ट्रेड करत आहेत. याचा अर्थ हा स्टॉक ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत नाही. ओरियनप्रो सोल्युशन्स कंपनीच्या शेअर्सचा बीटा 1.2 असून तो खूप उच्च अस्थिरतेचे निर्देशक आहे.

या आयटी सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीचा स्टॉक 2023 या वर्षात 184.60 टक्के मजबूत झाला आहे. तर मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 183 टक्के परतावा कमावून दिला आहे. ओरियनप्रो सोल्यूशन्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2311.83 कोटी रुपये आहे.

ओरियनप्रो सोल्युशन्स कंपनीने मार्च 2023 च्या तिमाहीत 32.21 टक्के वाढीसह 25.08 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 18.97 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मार्च 2023 तिमाहीत कंपनीने 38.69 टक्के वाढीसह 190.66 कोटी रुपये विक्री नोंदवली आहे. मार्च 2022 तिमाहीत कंपनीची विक्री 137.47 कोटी रुपये होती. मार्च 2023 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीचा ऑपरेटिंग नफा 33.69 टक्के वाढीसह 40.44 कोटी रुपये नोंदवला गेला होता, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 30.25 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

कंपनीचा निव्वळ नफा 37.72 टक्के वाढून आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 97.33 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. जो मागील आर्थिक वर्षात 70.67 कोटी रुपये होता. मार्च 2023 च्या तिमाहीत कंपनीच्या ऑपरेटिंग नफा 30 टक्के वाढीसह 145.04 कोटी रुपये नोंदवला गेला होता, जो मागील आर्थिक वर्षात 111.58 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Aurionpro Share Price today on 19 July 2023.

हॅशटॅग्स

Aurionpro Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x