21 May 2024 1:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 26 रुपयाचा रिलायन्स पॉवर शेअर खिसा पैशाने भरतोय, स्टॉकची जोरदार खरेदी IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी मिळेल मल्टिबॅगर परतावा, अशी संधी सोडू नका Infosys Share Price | कमाईची संधी सोडू नका! Infosys आणि TCS सहित हे 7 शेअर्स मजबूत परतावा देणार Hot Stocks | पैशाचा पाऊस पाडणारे 9 स्वस्त पेनी शेअर्स, अवघ्या 5 दिवसात 82 टक्केपर्यंत परतावा मिळतोय Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल मजबूत परतावा Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, संधी सोडू नका Home Loan Down Payment | पगारदारांनो! गृहकर्जासाठी डाऊन पेमेंटची रक्कम सहज मॅनेज होईल, फॉलो करा या टिप्स
x

RVNL Share Price | रेल विकास निगम शेअर जबरदस्त तेजीत वाढतोय, गुंतवणुकदारांच्या बक्कळ कमाईला सुरुवात, पुढे किती परतावा?

RVNL Share Price

RVNL Share Price | रेल विकास निगम लिमिटेड या नवरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही महिन्यांपासून जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. शुक्रवार दिनांक 21 जुलै 2023 रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांच्या वाढीसह 138.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. (Rail Vikas Nigam Share Price)

रेल विकास निगम लिमिटेड या सरकारी कंपनीच्या शेअर्सने मागील 5 दिवसात आपल्या गुंतवणुकदारांना 15.25 टक्के परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 21 जुलै 2023 रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 6.57 टक्के वाढीसह 137.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

मागील 3 महिन्यांपासून सुरू असलेल्या मतभेदानंतर भारत-रशिया वंदे भारत संयुक्त उपक्रम करार पुन्हा एका चर्चेत आला आहे. RVNL या सरकारी मालकीच्या रेल्वे कंपनीने सेबीला कळवले की, किनेट रेल्वे सोल्यूशन्स लिमिटेड, मेट्रोवॅगनमॅश आणि लोकोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक सिस्टम्स यांनी शेअर खरेदी करारावर स्वाक्षरी केली आहे. किनेट रेल्वे सोल्युशन्स लिमिटेड ही रेल विकास निगम लिमिटेड कंपनीची उपकंपनी म्हणून ओळखली जाते.

त्याच वेळी मेट्रोवॅगनमॅश ही ट्रान्समॅशहोल्डिंग या रशियन कंपनीची उपकंपनी म्हणून ओळखली जाते. मेट्रोवॅगनमैश आणि रेल विकास निगम लिमिटेड कंपनी आपल्या नवीन संयुक्त उपक्रमांतर्गत 120 वंदे भारत रेल्वे गाड्या बनवणार आहे. प्रत्येक वंदे भारत ट्रेनची किंमत 120 कोटी रुपये असेल.

नवीन स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त उपक्रमात रेल विकास निगम कंपनीकडे 25 टक्के भाग भांडवल असेल. तर मेट्रोवॅगनमॅश कंपनी 70 टक्के भाग भांडवल धारण करेल. लोकोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक सिस्टीम्स कंपनीचा वाटा फक्त 5 टक्के असेल. RVNL कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 343.13 टक्के नफा कमावून दिला आहे.

21 जुलै 2022 रोजी RVNL कंपनीचे शेअर्स 30.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 21 जुलै 2023 रोजी रेल विकास निगम कंपनीचे शेअर्स 138.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 2023 या वर्षात RVNL कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price today on 22 July 2023.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(58)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x