19 May 2024 1:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | तुमच्या कुटुंबातील मुलांच्या नावे या योजनेत फक्त 6 रुपयांची बचत करा, लाखात परतावा मिळेल My EPF Pension Money | नोकरदारांनो! आजच 'अर्ली पेन्शन' साठी ऑनलाईन अर्ज करा, अकाउंटमध्ये पैसे जमा होतील Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! या फंडात SIP बचत करा, अवघ्या 5 वर्षात मिळेल 50 लाख रुपये परतावा Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका
x

GNA Axles Share Price | सर्व बाजूने फायदा! जीएनए एक्सल्स शेअर्सने गुंतवणुकदारांना दुहेरी फायदा, फ्री बोनस शेअर्ससह डिव्हीडंड मिळणार

GNA Axles Share Price

GNA Axles Share Price | जीएनए एक्सल्स या वाहन ट्रान्समिशन उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे. नुकताच या कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्सचे वाटप करण्याची घोषणा केली होती. याशिवाय ही कंपनी आपल्या पात्र शेअर धारकांना लाभांश देखील वाटप करणार आहे. जीएनए एक्सल्स कंपनीने आपले चालू आर्थिक वर्ष 2023-24 मधील एप्रिल-जून 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहे. या तिमाहीत कंपनीने मागील वर्षाच्या तुलनेत 23 टक्के अधिक निव्वळ नफा कमावला आहे. (GNA Share Price)

मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 7 पट अधिक परतावा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात शुक्रवार दिनांक 21 जुलै 2023 रोजी जीएनए एक्सल्स कंपनीचे शेअर्स 2.19 टक्क्यांच्या वाढीसह 939.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 24 जुलै 2023 रोजी जीएनए एक्सल्स कंपनीचे शेअर्स 0.71 टक्के वाढीसह 942.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

बोनस स्टॉक आणि लाभांश रेकॉर्ड डेट :

जीएनए एक्सल्स कंपनीने मागील आठवड्यात शुक्रवारी आपल्या शेअर धारकांना लाभांश आणि बोनस शेअर्स वाटप करण्याची रेकॉर्ड तारीख जाहीर केली. बोनस शेअर्स वाटप करण्यापूर्वी ही कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना 6 रुपये लाभांश वाटप करणार आहे. या लाभांश वाटपाची रेकॉर्ड डेट म्हणून कंपनीने 11 ऑगस्ट 2023 हा दिवस निश्चित केला आहे. यासह जीएनए एक्सल्स ही कंपनी आपल्या शेअर धारकांना 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. यासाठी देखील कंपनीने 11 ऑगस्ट 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे.

जून 2023 तिमाहीत जीएनए एक्सल्स कंपनीची निव्वळ विक्री वार्षिक आधारावर 375.17 कोटी रुपयांवरून घसरून 374.02 कोटी रुपये नोंदवली गेली आहे. कंपनीचा तिमाही निव्वळ नफा 22.57 टक्क्यांच्या वाढीसह 33.13 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. 3 एप्रिल 2020 रोजी जीएनए एक्सल्स कंपनीचे शेअर्स 133.60 रुपयेवर ट्रेड करत होते. आज हा स्टॉक 942.45 रुपये किमतीवर पोहचला आहे.

मागील तीन वर्षांत जीएनए एक्सल्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 600 टक्के नफा कमावून दिला आहे. 4 ऑगस्ट 2022 रोजी जीएनए एक्सल्स कंपनीचे शेअर्स 554.75 रुपये या आपल्या वार्षिक नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर 24 फेब्रुवारी 2023 रोजी म्हणजेच अवघ्या 6 महिन्यांत जीएनए एक्सल्स कंपनीचे शेअर्स 76 टक्क्यांच्या वाढीसह 977 रुपये या आपल्या वार्षिक उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | GNA Axles Share Price today on 24 July 2023.

हॅशटॅग्स

GNA Axles Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x