18 May 2024 10:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Havells Share Price | होय! हॅवेल्स इंडिया शेअरने अवघ्या 82000 रुपये गुंतवणूकीवर दिला 1 कोटी रुपये परतावा, शेअर खरेदी करावा का?

Havells Share Price

Havells Share Price | हॅवेल्स इंडिया या फॅन, एसी आणि लाईट मेकर कंपनीचे शेअर्सने दीर्घ काळात आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. मागील 14 वर्षांत हॅवेल्स इंडिया कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अवघ्या 82,000 रुपये गुंतवणुकीवर एक कोटीपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आता ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजने जून 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल पाहून हॅवेल्स इंडिया कंपनीच्या स्टॉकवर बाय रेटिंग दिली आहे.

ब्रोकरेज फर्मच्या मते सध्याच्या किंमत पातळीपासून हॅवेल्स इंडिया कंपनीचे शेअर्स 11 टक्क्यांनी वाढू शकतात. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हॅवेल्स इंडिया कंपनीचे शेअर्स 3.36 टक्क्यांच्या घसरणीसह 1303.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज सोमवार दिनांक 24 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.69 टक्के घसरणीसह 1,294.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

गुंतवणुकदार झाले करोडपती :

6 मार्च 2009 रोजी हॅवेल्स इंडिया कंपनीचे शेअर्स 10.61 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 21 जुलै 2023 रोजी हॅवेल्स इंडिया कंपनीचे शेअर्स 1303.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 14 वर्षात हॅवेल्स इंडिया कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 12182 टक्के परतावा कमावून दिला आहे. अवघ्या 82,000 रुपये गुंतवणुकीवर गुंतवणुकदार करोडपती झाले आहेत. 26 डिसेंबर 2022 रोजी हॅवेल्स इंडिया कंपनीचे शेअर्स 1092 रुपये या आपल्या वार्षिक नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. त्यांनतर स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी वाढली आणि, अवघ्या 7 महिन्यांत हॅवेल्स इंडिया स्टॉक 29 टक्क्यांच्या वाढीसह गुरुवार दिनांक 20 जुलै 2023 रोजी 1,408 रुपये या वार्षिक उच्चांक किमतीवर पोहचले होते.

पुढील ट्रेण्ड :

चालू आर्थिक वर्ष 2023-24 च्या जून 2023 या पहिल्या तिमाहीच्या एप्रिल-जून 2023 या महिन्यात कंपनीच्या महसुलात 14 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. ब्रोकरेज फर्म HDFC सिक्युरिटीजने कंपनीच्या महसुलात 8 टक्क्यांची वाढ होईल, असा नदाज व्यक्त केला होता. मात्र कंपनीने महसुलात 14 टक्के वाढ नोंदवून गुंतवणुकदारांना सुखद धक्का दिला. ब्रोकरेज फर्मच्या मते B2C विभाग अजूनही सुस्त आहे. 2023-24 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत म्हणजेच एप्रिल-सप्टेंबर 2023 मध्ये कंपनीच्या कामगिरीत सकारात्मक वाढ होण्याची शक्यता मजबूत आहे. म्हणून ब्रोकरेज फर्मने हॅवेल्स इंडिया कंपनीच्या शेअरवर 1,450 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Havells Share Price today on 24 July 2023.

हॅशटॅग्स

Havells Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x