18 May 2024 8:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Tirupati Tyres Share Price | तिरुपती पावला! 2200 टक्के परतावा देणारा तिरुपती टायर्स शेअर स्प्लिट होणार, गुंतवणूकदारांना दुहेरी फायदा

Tirupati Tyres Share price

Tirupati Tyres Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. याकाळात अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस नफा कमावून दिला आहे. असाच एक मल्टीबॅगर शेअर म्हणजे तिरुपती टायर्स. तिरुपती टायर्स कंपनीच्या शेअर्सने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 2,100 टक्के नफा कमावून दिला आहे. आता ही कंपनी आपले शेअर्स विभाजन करणार आहे.

सेबीला दिलेल्या माहितीत कंपनीने कळवले आहे गुरुवार दिनांक 27 जुलै 2023 रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत संचालक मंडळ विविध प्रस्तावांवर चर्चा करून स्टॉक स्प्लिटचा निर्णय जाहीर करू शकतो. आज मंगळवार दिनांक 25 जुलै 2023 रोजी तिरुपती टायर्स कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 42.47 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

शेअर स्प्लिट निर्णय :

तिरुपती टायर्स कंपनीने सेबी दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, गुरूवार दिनांक 27 जुलै 2023 रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत स्टॉक स्प्लिटबाबत निर्णय घेतला जाणार आहे. याशिवाय कंपनी आपले भाग भांडवल वाढवण्यासाठी मेमोरँडम ऑफ असोसिएशनमध्ये काही बदल करणार असून त्याबाबत संचालकांची मंजुरी घेतली जाणार आहे. तिरुपती टायर्स लिमिटेड कंपनी मुख्यतः ऑटोमोबाईल पार्ट्स बनवण्याचे काम करते. तसेच ही कंपनी सायकल, मोटरसायकल, मोपेड, स्कूटर, ऑटो रिक्षा, ट्रॅक्टर, ट्रक आणि बस इत्यादींसाठी टायर आणि ट्यूब बनवण्याचे काम देखील करते.

1 लाखावर दिला 22 लाख परतावा :

मागील 3 वर्षात तिरुपती टायर्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1 लाखावर 22 लाख रुपये परतावा कमावून दिला आहे. शुक्रवारी दिनांक 22 जुलै 2022 रोजी तिरुपती टायर्स कंपनीचे शेअर्स 1.10 टक्क्यांच्या वाढीसह 38.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर 21 जुलै 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.71 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 3 वर्षांत तिरुपती टायर्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 2,150 टक्के नफा लावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tirupati Tyres Share price today on 25 July 2023.

हॅशटॅग्स

Tirupati Tyres Share price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x