12 May 2024 5:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 13 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR भरण्यासाठी फॉर्म-16 का आवश्यक आहे? नसल्यास काय करायचं जाणून घ्या Tata Altroz | टाटा मोटर्सच्या प्रसिद्ध हॅचबॅक कार वर बंपर डिस्काउंट, शो-रुमध्ये ऑफर येताच बुकिंगला गर्दी Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी या बँका देत आहेत भरमसाठ व्याजदर, बचतीवर मोठा परतावा Bank Account Alert | फायद्यात राहा! बँक FD वर मिळतंय 9.1% पर्यंत व्याज, योग्य ठिकाणी पैसा गुंतवा Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या New Tax Regime Slab | पगारदारांनो! नव्या टॅक्स प्रणालीचे 8 फायदे, इन्कम टॅक्स स्लॅब ते स्टँडर्ड डिडक्शन तपशील नोट करा
x

Nettlinx Share Price | नेटफ्लिक्स वेब-सिरीजवर पैसे खर्च करण्यापेक्षा नेटलिंक्स शेअर्स खरेदी करा, रोज अप्पर सर्किट तोडतोय, डिटेल्स जाणून घ्या

Nettlinx Share Price

Nettlinx Share Price | मागील काही दिवसांपासून नेटलिंक्स कंपनीच्या शेअरमध्ये अप्पर सर्किट लागत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील नेटलिंक्स कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. या कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी येण्याचे कारण म्हणजे कंपनीने आपले जून तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत.

सेबीला दिलेल्या माहितीत नेटलिंक्स कंपनीने कळवले आहे की, कंपनीच्या निव्वळ नफ्यात जून तिमाहीत तब्बल 2500 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अप्पर सर्किट हीट केल्यानंतर हा स्टॉक 91.85 रुपये किमतीवर पोहचला होता. आज सोमवार दिनांक 31 जुलै 2023 रोजी नेटलिंक्स कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के वाढीसह 96.44 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

नेटलिंक्स जून तिमाही कामगिरी :

हैदराबाद स्थित नेटलिंक्स या IT कंपनीने एप्रिल ते जून 2023 या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते. या तिमाही कालावधीत नेटलिंक्स कंपनीने 1.65 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी जून 2022 तिमाहीत या कंपनीने 0.06 कोटी रुपये निव्वळ नफा नोंदवला होता. जून 2023 तिमाहीत नेटलिंक्स कंपनीच्या महसूलात 133 टक्क्यांची वाढ झाली असून कंपनीने 4.66 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षीच्या जून 2022 तिमाहीत नेटलिंक्स कंपनीने 2 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

कंपनीची कामगिरी :

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये नेटलिंक्स कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 91.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्याची उच्चांक पातळी किंमत 136.00 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 32.78 रुपये होती. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना अवघ्या सहा महिन्यात 86.36 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 130.44 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचा व्यवसाय आणि उल्लेखनीय उपस्थिती आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यात लक्षणीय आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Nettlinx Share Price today on 31 July 2023.

हॅशटॅग्स

Nettlinx Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x