13 May 2024 12:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 13 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल SBI Mutual Fund | कुटुंबातील लहान मुलांचं आयुष्य बदलेल ही SBI फंडाची खास योजना, अल्पावधीत 30 लाख रुपये मिळतील Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 13 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR भरण्यासाठी फॉर्म-16 का आवश्यक आहे? नसल्यास काय करायचं जाणून घ्या Tata Altroz | टाटा मोटर्सच्या प्रसिद्ध हॅचबॅक कार वर बंपर डिस्काउंट, शो-रुमध्ये ऑफर येताच बुकिंगला गर्दी Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी या बँका देत आहेत भरमसाठ व्याजदर, बचतीवर मोठा परतावा Bank Account Alert | फायद्यात राहा! बँक FD वर मिळतंय 9.1% पर्यंत व्याज, योग्य ठिकाणी पैसा गुंतवा
x

FDC Share Price | मल्टिबॅगर एफडीसी शेअर्स कंपनी बायबॅक करणार, अल्पावधीत मजबूत परतावा, गुंतवणूक करून फायदा घ्यावा?

FDC Share Price

FDC Share Price | एफडीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. मात्र आज स्टॉक मध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. या कंपनीने नुकताच बायबॅक ची घोषणा केली होती. याची रेकॉर्ड तारीख म्हणून कंपनीने 9 ऑगस्ट 2023 हा दिवस निश्चित केला होता. या एका बातमीमुळे गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात हा स्टॉक खरेदी करायला सुरुवात केली आहे.

कालच्या ट्रेडिंग सेशनमधे या कंपनीचे शेअर्स बीएसई इंडेक्सवर 10.44 टक्क्यांच्या वाढीसह 378.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी एफडीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.10 टक्के घसरणीसह 368.85 रुपये किमतीवर ट्रेड करतआहेत.

एफडीसी लिमिटेड ही फार्मा क्षेत्रात व्यवसाय करणारी कंपनी आहे. ही कंपनी जेनेरिक औषधे तसेच फॉर्म्युला बेस्ड औषधे बनवण्याचे काम करते. याशिवाय ही कंपनी निर्जलीकरणावर उपयोगी असलेले ओआरएस बनवण्याचे काम देखील करते. एफडीसी लिमिटेड कंपनीच्या उत्पादन श्रेणीमध्ये खाद्यपदार्थ आणि विविध पेय सामील आहेत. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 41.62 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे.

मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 10.82 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 378.45 रुपये होती. तर 52 आठवड्याची नीचांक पत्की किम्मा 245 रुपये होती. FDC लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल.6211 कोटी रुपये आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 34.08 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 43.19 टक्के वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | FDC Share Price today on 04 August 2023.

हॅशटॅग्स

FDC Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x