18 May 2024 1:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी स्टॉकची यादी सेव्ह करा Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा स्टॉक हाय रिस्क, हाय रिवॉर्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी शेअरबाबत मोठे संकेत दिले RVNL Share Price | RVNL स्टॉकमध्ये तुफान तेजी, शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने धावतोय, फायदा घेणार? Wipro Share Price | विप्रो स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआऊटचे संकेत, मोठी कमाई होणार, टार्गेट प्राइस जाणून घ्या Ashok Leyland Share Price | मालामाल करणाऱ्या स्टॉकच्या खरेदीला ऑनलाईन गर्दी, तज्ज्ञांचा शेअर्स खरेदीचा सल्ला Infosys Share Price | इन्फोसिस शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक स्वस्तात विकत घ्यावा? Hold करावा की Sell करावा? Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR करताना 'या' 10 चुका टाळा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा
x

SBFC Finance IPO | आयपीओ जॅकपॉट लागला रे! SBFC फायनान्स IPO शेअरने पहिल्याच दिवशी 53 टक्के परतावा दिला, खरेदी वाढली

SBFC Finance IPO

SBFC Finance IPO | नुकताच SBFC फायनान्स कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. आज या कंपनीचे शेअर बाजारात सूचीबद्ध झाले आहेत. SBFC फायनान्स कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. ग्रे मार्केटमध्ये देखील गुंतवणूकदारांनी SBFC फायनान्स कंपनीच्या IPO शेअर्सला मजबूत प्रतिसाद दिला होता. SBFC फायनान्स कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये आपल्या किंमत बँडच्या तुलनेत 53 टक्के प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होते. (SBFC Finance Share Price)

आज बुधवार दिनांक 16 ऑगस्ट 2023 रोजी SBFC फायनान्स कंपनीचे IPO शेअर्स 82 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत. सध्या हा स्टॉक 92.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ग्रे मार्केटमध्ये या कंपनीचे शेअर्स 30 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत होते. शेअर बाजार तज्ञांच्या मते, शुक्रवारी SBFC फायनान्स कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 26 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. SBFC फायनान्स कंपनीच्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 54-57 रुपये निश्चित करण्यात आली होती. या कंपनीचे शेअर्स 57 रुपये अप्पर बँडवर वाटप करण्यात आले होते.

SBFC फायनान्स कंपनीचे शेअर्स आज 82 रुपये किमतीवर ओपन झाले होते. म्हणजेच गुंतवणूकदारांना स्टॉक लिस्टिंगवर 53 टक्के नफा मिळाला आहे. SBFC फायनान्स कंपनीचा IPO एकूण 74 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. या कंपनीच्या IPO मध्ये रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 11.60 पट अधिक सबस्क्राइब झाला आहे. तर क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सचा राखीव कोटा 203.61 पट अधिक सबस्क्राइब झाला होता.

गैरसंस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा एकूण 51.82 पट अधिक खरेदी केला गेला होता. SBFC फायनान्स कंपनीच्या IPO मध्ये कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 6.21 पट अधिक खरेदी केला गेला होता. SBFC फायनान्स कंपनीच्या आयपीओचा आकार 1025 कोटी रुपये होता. SBFC फायनान्स कंपनीचा IPO 3 ऑगस्ट 2023 ते 7 ऑगस्ट 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SBFC Finance IPO stock price today on 16 August 2023.

हॅशटॅग्स

SBFC Finance IPO(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x