15 May 2024 7:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

Vikas Lifecare Share Price | सरकार विकास करो न करो! पण 3 रुपये 60 पैशाचा विकास लाईफकेअर शेअर मोठा परतावा देतं विकास करतोय

Vikas Lifecare Share Price

Vikas Lifecare Share Price | विकास लाईफकेअर या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्समध्ये लक्षणीय चढ उतार पाहायला मिळत आहे. मागील 3 दिवसात विकास लाईफकेअर कंपनीच्या शेअर्समध्ये 37 टक्के पाहायला मिळाली होती. विकास लाइफकेअर कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. मात्र स्टॉकमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे.

विकास लाइफकेअर कंपनीच्या शेअर्समध्ये ही उसळी मजबूत तिमाही निकाल आणि कंपनीच्या व्यावसायिक बातम्यांमुळे पाहायला मिळत आहे. आज शुक्रवार दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी विकास लाईफकेअर कंपनीचे शेअर्स 4.00 टक्के घसरणीसह 3.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

विकास लाइफकेअर कंपनीने जून 2023 च्या तिमाहीत जबरदस्त नफा कमावला आहे. मार्च 2023 च्या तिमाहीत विकास लाईफकेअर कंपनीला 25.97 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. आता एप्रिल ते जून 2023 या तिमाहीत विकास लाईफकेअर कंपनीने 13.31 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. वार्षिक आधारावर विकास लाईफकेअर कंपनीच्या नफ्यात जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 10 टक्के परतावा कमावून दिला आहे.

विकास लाइफकेअर कंपनीने मागील वर्षी जून 2022 तिमाहीत 2.34 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तर जून 2023 च्या तिमाहीत हा निव्वळ नफा वाढून 13.31 कोटी रुपयेवर पोहोचला आहे. विकास लाईफकेअर कंपनीने MSR Apparels मधील 98 टक्के भाग भांडवल खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. या कंपनीने ही गुंतवणूक करण्यासाठी 12.5 कोटी रुपये लावले आहेत.

MSR Apparels ही कंपनी विविध प्रकारच्या कापड, कपड्यांचे सामान बनवण्याचे काम करते. या करारानंतर MSR Apparels ही कंपनी विकास लाइफकेअर कंपनीच्या उपकंपनी गटात सामील झाली आहे. या नवीन डीलमुळे विकास लाइफकेअर कंपनीच्या उत्पादन पोर्टफोलिओमध्ये वैविध्यपूर्णता पाहायला मिळेल.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vikas Lifecare Share Price today on 18 August 2023.

हॅशटॅग्स

Vikas Lifecare Share Price(37)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x