18 May 2024 2:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये ब्रेकआउटचे संकेत, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राइस, किती फायदा? Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी स्टॉकची यादी सेव्ह करा Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा स्टॉक हाय रिस्क, हाय रिवॉर्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी शेअरबाबत मोठे संकेत दिले RVNL Share Price | RVNL स्टॉकमध्ये तुफान तेजी, शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने धावतोय, फायदा घेणार? Wipro Share Price | विप्रो स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआऊटचे संकेत, मोठी कमाई होणार, टार्गेट प्राइस जाणून घ्या
x

Gokaldas Exports Share Price | मार्ग श्रीमंतीचा! गोकलदास एक्स्पोर्ट्स शेअरने फक्त 4 दिवसात 50 टक्के परतावा दिला, विचार करा

Gokaldas Exports Share Price

Gokaldas Exports Share Price | गोकलदास एक्स्पोर्ट्स या रेडिमेड कपड्यांचे उत्पादन आणि निर्यात करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त आदळआपट पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 19 टक्क्याच्या वाढीसह 883.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 4 दिवसात गोकलदास एक्स्पोर्ट्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 50 टक्के परतावा कमावून दिला आहे.

आज मात्र या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळाली आहे. बुधवारी या कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी एका मोठ्या डीलमुळे पाहायला मिळाली होती. गोकलदास एक्स्पोर्ट्स कंपनीने दुबई स्थित एका कंपनीचे अधिग्रहण केले आहे. गोकलदास एक्सपोर्ट्स कंपनीने दुबईस्थित अट्राको ग्रुपला खरेदी केले आहे. आज गुरूवार दिनांक 31 ऑगस्ट 2023 रोजी गोकलदास एक्स्पोर्ट्स कंपनीचे शेअर्स 9.26 टक्के घसरणीसह 787.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

गोकलदास एक्स्पोर्ट्स कंपनीने अट्राको ग्रुप ही कंपनी 555 दशलक्षमध्ये खरेदी केली आहे. आणि आता कंपनीचा व्यापार जागतिक स्तरावर पोहचला आहे. अट्राको ग्रुपने UAE आणि आफ्रिकेत बरीच मालमत्ता बनवली आहे. आताब्या कंपनीचे पूर्ण संपादन 2023-24 या चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

या डीलची बातमी आल्यावर अवघ्या 4 दिवसात गोकलदास एक्स्पोर्ट्स कंपनीचे शेअर्स 50 टक्के मजबूत झाले आहेत. 25 ऑगस्ट 2023 रोजी गोकलदास एक्सपोर्ट्स कंपनीचे शेअर्स 580.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. अवघ्या पाच दिवसात म्हणजेच 30 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 883.55 रुपये किमतीवर पोहोचले होते.

मागील एका महिन्यात गोकलदास एक्स्पोर्ट्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 64 टक्के परतावा कमावून दिला आहे. अट्राको ग्रुप ही दुबईस्थित परिधान कंपनीचा व्यवसाय अमेरिका आणि युरोपमध्ये देखील विस्तारला आहे. ही कंपनी विविध वयोगटांसाठी शॉर्ट्स, पँट, टी-शर्ट बनवण्याचे काम करते. या कंपनीचे 4 उत्पादन केंद्र केनियामध्ये चालू आहेत. याशिवाय कंपनीचे 1 उत्पादन केंद्र इथिओपियामध्ये देखील चालू आहे. ही वार्षिक आधारावर 40 दशलक्ष कपड्याचे उत्पादन करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Gokaldas Exports Share Price today on 31 August 2023

हॅशटॅग्स

#Gokaldas Exports Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x