18 May 2024 4:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये ब्रेकआउटचे संकेत, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राइस, किती फायदा? Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी स्टॉकची यादी सेव्ह करा Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा स्टॉक हाय रिस्क, हाय रिवॉर्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी शेअरबाबत मोठे संकेत दिले
x

Multibagger Stock | कुबेर आशीर्वाद लाभलेला शेअर! 60 पैशाचा शेअर, 50,000 रुपयाच्या गुंतवणुकीवर 1 कोटींपेक्षा जास्त परतावा मिळाला

Multibagger Stock

Multibagger Stock | प्राइम इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीच्या शेअरने अवघ्या काही वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना करोडपती बनवले आहे. खाद्यतेल क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या प्राइम इंडस्ट्रीज कंपनीचे एकूण बाजार भांडवल 209.83 कोटी रुपये आहे. मागील 5 वर्षांत प्राइम इंडस्ट्रीज कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती केले आहे.

एकेकाळी या कंपनीचे शेअर्स फक्त 60 पैसे किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आता हा स्टॉक 134 रुपये किमतीवर पोहचला आहे. बुधवार दिनांक 30 ऑगस्ट 2023 रोजी प्राइम इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 0.74 टक्के घसरणीसह 134 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज शुक्रवार दिनांक 1 सप्टेंबर 2023 रोजी प्राइम इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 1.37 टक्के वाढीसह 136.85 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

5 वर्षांपूर्वी म्हणजेच 16 ऑगस्ट 2018 रोजी प्राइम इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 0.60 पैसे किमतीवर ट्रेड करत होते. तेव्हापासून आतापर्यंत या कंपनीच्या शेअरची किंमत 22,233.33 टक्के वाढली आहे. जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी प्राइम इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.2 कोटी रुपये झाले असते. जर तुम्ही 50,000 रुपये लावले असते तर तुमच्या पैशाचे मूल्य 1 कोटींपेक्षा जास्त झाले असते.

प्राइम इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना अप्रतिम कमाई करून दिली आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 2,336.36 टक्के परतावा मिळवून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 2,452.38 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स फक्त 2.39 टक्के वाढले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stock of Prime Industries share price today on 01 September 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x