12 May 2024 2:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या New Tax Regime Slab | पगारदारांनो! नव्या टॅक्स प्रणालीचे 8 फायदे, इन्कम टॅक्स स्लॅब ते स्टँडर्ड डिडक्शन तपशील नोट करा Post Office Interest Rate | या योजनेत ज्येष्ठ नागरिकांचा दैनंदिन खर्च भागेल, व्याजातून मिळतील रु.10,250 My EPF Money | नोकरदारांनो! जॉब बदलला आहे? तुमच्या EPF संबंधित हे काम करा, अन्यथा पैशाचे नुकसान अटळ Post Office Scheme | फायदाच फायदा! पोस्ट ऑफिसच्या स्कीममध्ये महिना रु.1,000 गुंतवा, मिळतील रु. 8,24,641 Quant Mutual Fund | पगारदारांनो! बँक FD नव्हे, या 10 SIP योजना 40 टक्केपर्यंत परतावा देऊन पैसा वाढवतील Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल
x

Praj Industries Share Price | प्राज इंडस्ट्रीज शेअर्समध्ये 70000 रुपये गुंतवणारे करोडपती झाले, पुढेही फायद्याचा आहे हा शेअर

Praj Industries Share Price

Praj Industries Share Price | प्राज इंडस्ट्रीज या अभियांत्रिकी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घकालीनच नाही तर अल्पावधीतही मजबूत कमाई करून दिली आहे. मागील 20 वर्षात या कंपनीच्या शेअरने अवघ्या 70,000 रुपयेवर कारोडोचा परतावा दिला आहे. मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरने लोकांना 544 टक्के परतावा मिळवून दिला आहे.

मागील 6 महिन्यांत 72 टक्के परतावा मिळवून दिला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये प्राज इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 0.23 टक्के वाढीसह 482 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज शुक्रवार दिनांक 1 सप्टेंबर 2023 रोजी प्राज इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 0.071 टक्के घसरणीसह 492.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

प्राज इंडस्ट्रीज कंपनीचे एकूण बाजार भांडवल 8,854.97 कोटी रुपये आहे. 22 ऑगस्ट 2003 रोजी प्राज इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स फक्त 3.34 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 492 रुपये किमतीवर पोहचला आहे. मागील 20 वर्षांत प्राज इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 14331 टक्के परतावा कमावून दिला आहे. 30 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 482 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

28 मार्च 2023 रोजी या कंपनीच्या शेअरने 299 रुपये ही आपली वार्षिक नीचांक किंमत पातळी स्पर्श केली होती. मागील आठवड्यात 22 ऑगस्ट 2023 रोजी प्राज इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 514 रुपये या आपल्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. सध्या उच्चांक किंमत पातळी स्टॉक 6 टक्के घसरला आहे.

देशांतर्गत ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजच्या तज्ञांच्या मते, प्राज इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स आपल्या 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 200 दिवसाच्या एक्सपोनेन्शिअल मूव्हिंग एव्हरेज किमतीच्या वर ट्रेड करत आहेत. प्राज इंडस्ट्रीज स्टॉकला 491.1 रुपये, नंतर 501.1 रुपये, आणि नंतर 507.5 रुपये किमतीवर रेझिस्टन्स पाहायला मिळत आहे. आणि प्राज इंडस्ट्रीज कंपनीच्या स्टॉकमध्ये 474.7 रुपये, नंतर 468.3 रुपये आणि 458.3 रुपये किमतीवर लोअर सपोर्ट पाहायला मिळत आहे.

प्राज इंडस्ट्रीज ही कंपनी मुख्यतः इथेनॉलचे उत्पादन करणारी भारतातील दिग्गज कंपनी मानली जाते. भारतातील जैवइंधन उत्पादन वाढवण्यासाठी प्राज आणि इंडियन ऑइल या दोन्ही मोठ्या कंपनीने व्यापारी करार केला आहे. प्राज कंपनीने सेंट्रल पॉवर इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, झिरो लिक्विड डिस्चार्ज, आणि एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट्स विभागांमध्ये आपले स्थान मजबूत करण्यासाठी विविध योजना आखल्या आहेत. कंपनीची कामगिरी आणि व्यापार वाढीचे संकेत पाहून ब्रोकरेज फर्म अॅक्सिस सिक्युरिटीजने प्राज इंडस्ट्रीज कंपनीच्या स्टॉकवर 500 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Praj Industries Share Price today on 01 September 2023.

हॅशटॅग्स

Praj Industries Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x