17 May 2024 2:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rajnish Retail Share Price | अवघ्या 63 पैशाचा शेअर! 4 वर्षात दिला 14000% परतावा, स्टॉक आजही स्वस्त आणि फायद्याचा Suzlon Share Price | सुझलॉन स्टॉक ब्रेकआऊट लेव्हल अपडेट, शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा सल्ला काय? IREDA Share Price | तज्ज्ञांचा IREDA शेअर्स 'Hold' चा सल्ला, या प्राईसवर मजबूत सपोर्ट, पुढची टार्गेट प्राईस जाहीर HDFC Mutual Fund | अबब! जबरदस्त म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 9.57 कोटी रुपये परतावा दिला Gold Rate Today | टेन्शन वाढलं! आज सोन्याचा भाव अजून महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या My EPF Money | पगारदारांनो! तुमच्या खात्यातही पैसे जमा झाले असतील तर पटापट तपासून घ्या, नियम बदलला Shukra Rashi Parivartan | 'या' 3 नशीबवान राशीत तुमची राशी आहे का? शुक्र राशी परिवर्तन ठरणार अत्यंत भाग्यशाली
x

IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्स एका दिवसात 8 टक्के वाढले, आज देखील स्टॉक तेजीत, गुंतवणूक करावी?

IRFC Share Price

IRFC Share Price | आयआरएफसी लिमिटेड म्हणजेच इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून जबरदस्त तेजीत धावत आहे. आयआरएफसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 8.46 टक्के वाढीसह 74.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 75.72 रुपये होती.

IRFC कंपनीचे एकूण बाजार भांडवल 95,569.98 कोटी रुपये आहे. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. आज शुक्रवार दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी आयआरएफसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.67 टक्के वाढीसह 75.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

शेअर बाजारातील तज्ञांनी माहिती दिली आहे की, 2024-2031 या काळात भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने 5.25 लाख कोटी रुपये गुंतवणूक करून रेल्वे पायाभूत सुविधांचा विकास करण्याची घोषणा केली आहे. या सकारात्मक बातमीमुळे रेल्वे कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. IRFC स्टॉक दैनंदिन आणि साप्ताहिक चार्टवर मजबूत वाढीचे संकेत देत आहे. पुढील काळात हा स्टॉक 80 रुपये किंमत स्पर्श करू शकतो, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.

आयआरएफसी लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 221 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 2023 या वर्षाच्या सुरुवातपासून आतपर्यंत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 122.19 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी आयआरएफसी लिमिटेड स्टॉक मल्टीबॅगर ठरला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 160.61 टक्के परतावा कमावून दिला आहे.

IRFC कंपनी रेल्वे मालमत्तेचे संपादन आणि विकास सुलभ करण्यासाठी वित्त बाजारांतून निधी उभारण्याचे काम करते आणि कंपनी आपल्या मालमत्ता भारतीय रेल्वे किंवा रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या इतर संस्थांना भाडेतत्त्वावर देते. आयआरएफसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2021 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. या कंपनीच्या IPO मध्ये शेअरची किंमत 26 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| IRFC Share Price today on 8 September 2023

हॅशटॅग्स

IRFC Share Price(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x