19 May 2024 7:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

SJVN Share Price | एसजेवीएन शेअरने एका दिवसात 14 टक्के परतावा दिला, आज स्वस्तात मिळतोय, फायदा घ्यावा का?

SJVN Share Price

SJVN Share Price | सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एसजेवीएन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 14 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. एसजेवीएन लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये अचानक वाढ होण्याचे कारण म्हणजे, कंपनीच्या एका सहायक कंपनीला नवीन काम मिळाले आहे. सेबीला दिलेल्या माहितीत एसजेवीएन लिमिटेड कंपनीने कळवले आहे की, भाक्रा बीज मॅनेजमेंट बोर्ड आणि एसजेव्हीएन ग्रीन एनर्जी लिमिटेड यांनी वीज खरेदी करार संपन्न केला आहे.

सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 66.85 रुपये किंमत पातळीवर ओपन झाले होते आणि काही वेळात हा स्टॉक 73 रुपये किमतीवर पोहचला होता. मात्र आज मंगळवारी (12 Sept 2023) SJVN शेअर्स 5.79% घसरून (NSE) 72.35 रुपयांवर ट्रेड करत आहेत.

सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एसजेवीएन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 14.06 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. एसजेवीएन लिमिटेड या कंपनीचे बाजार भांडवल 26,329 कोटी रुपये आहे. नवीन मिळालेल्या कॉन्ट्रॅक्टनुसार एसजेवीएन लिमिटेड कंपनीला 18 मेगावॅट सॉल्व्ह पॉवर निर्मिती करण्याचे देण्यात आले आहे. ही या कंपनीसाठी एक मोठी ऑर्डर असणार आहे.

पुढील 3 वर्षांत एसजेवीएन लिमिटेड कंपनी 10,000 मेगावॅट्स क्षमतेच्या अक्षय ऊर्जा क्षमतेचे प्लांट उभारण्याची तयारी करत आहे. त्याच वेळी 2023 च्या शेवटपर्यंत एसजेवीएन लिमिटेड कंपनी 25,000 मेगावॅट्स अक्षय ऊर्जा निर्मिती करण्याचे लक्ष गाठण्याचा प्रयत्न करणार आहे.

एसजेवीएन लिमिटेड कंपनीने 2040 पर्यंत अक्षय ऊर्जा क्षेत्रात 50,000 मेगावॅट वीज निर्मिती क्षमता असलेला प्रकल्प उभारण्याची योजना तयार करत आहे. मागील एका महिन्यात एसजेवीएन लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 19 टक्के परतावा कमवून दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी 6 महिन्यांपूर्वी या कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता दुप्पट झाले आहे. एसजेवीएन लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 73 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SJVN Share Price today on 12 September 2023.

हॅशटॅग्स

SJVN Share price(25)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x