20 May 2024 2:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rattan Power Share Price | हा शेअर श्रीमंत बनवणार! प्राईस 13 रुपये, 1 महिन्यात दिला 60% परतावा, खरेदी करा Gold Rate Today | कसं परवडणार? आज सोन्याचा भाव खूप महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Penny Stocks | चिल्लर प्राईस टॉप 10 पेनी स्टॉक, अल्पावधीत मालामाल करणारा परतावा मिळू शकतो IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, लवकरच गुंतवणूक दुप्पट होणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी आणि टाटा पॉवर शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग, टार्गेट प्राइस जाहीर Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना मजबूत व्याज देणाऱ्या 5 बँकांच्या FD योजना, मिळेल 9.60% पर्यंत व्याज
x

Brightcom Share Price | मालामाल शेअर! ब्राइटकॉम गृप शेअर्स पुन्हा तेजीत, 5 दिवसात 20 टक्के परतावा दिला, तेजीचं नेमकं कारण काय?

Brightcom Share Price

Brightcom Share Price | मागील काही दिवसांपासून ब्राइटकॉम गृप कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये 15.16 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे.

या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीचे जे 11.3 लाख तारण ठेवण्यात आले होते, ते सर्व शेअर्स आता विकले गेले आहेत. ब्राइटकॉम गृप कंपनीच्या प्रवर्तकांनी आपले तारण ठेवलेले शेअर्स दोन दिवसांपूर्वी विकले आहेत. आज गुरूवार दिनांक 14 सप्टेंबर 2023 रोजी ब्राइटकॉम गृप कंपनीचे शेअर्स 4.70 टक्के वाढीसह 16.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

कंपनीचे प्रमोटर एम सुरेश कुमार रेड्डी यांच्याकडे कंपनीच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदाची जबाबदारी आहे. यांचा कंपनीत 0.76 टक्के वाटा आहे. त्यांनी कंपनीचे 47.61 टक्के भाग भांडवल म्हणजेच 73 लाख इक्विटी शेअर्स दोन कंपन्यांकडे गहाण ठेवले होते.

10 सप्टेंबर 2023 रोजी एकूण 11.3 लाख तारण असलेले शेअर्स पुन्हा सोडवण्यात आले, ज्यापैकी 8.5 लाख शेअर्स कम्फर्ट फिनकॅप लिमिटेडक कंपनीकडे तारण ठेवण्यात आले होते आणि 2.8 लाख शेअर्स लुहारुका मीडिया अँड इन्फ्रा लिमिटेड कंपनीकडे तारण ठेवण्यात आले होते. आता एकूण तारण ठेवण्यात आलेल्या शेअर्समधून 46.5 लाख शेअर्स Comfort Fincap Ltd कडे आहेत, आणि 15.5 लाख शेअर्स Luharuka Media & Infra Ltd कडे आहे.

आता ज्या कंपनीकडे ब्राइटकॉम गृप कंपनीचे शेअर्स तारण ठेवण्यात आले होते, ते आता कंपनीचे शेअर्स विकत आहेत. ब्राइटकॉम गृप कंपनीच्या प्रवर्तकाने यापूर्वी 55 लाख शेअर्स कम्फर्ट फिनकॅप लिमिटेड कंपनीकडे तारण ठेवले होते, आणि 18.3 लाख शेअर्स लुहारुका मीडिया अँड इन्फ्रा लिमिटेड कंपनीकडे तारण ठेवले होते.

मागील तीन वर्षात ब्राइटकॉम गृप कंपनीच्या स्टॉकने लोकांना 316.67 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील पाच दिवसांत या कंपनीचे शेअर्स 20.58 टक्के वाढले आहेत. तर महिल एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 36.80 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअरची किंमत 42.71 टक्के कमी झाली आहे.

मागील एका वर्षात या कंपनीचे शेअर्स 63.55 टक्के कमजोर झाले आहेत. ब्राइटकॉम गृप कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 43.65 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 9.27 रुपये होती. ब्राइटकॉम गृप कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3,059.17 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Brightcom Share Price today on 14 September 2023.

हॅशटॅग्स

Brightcom Share Price(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x