18 May 2024 8:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

CCD Share Price | कडक कॉफी! कॅफे कॉफी डे शेअर्समध्ये पुन्हा अप्पर सर्किटची मालिका, एका महिन्यात 37% परतावा

CCD Share Price

CCD Share Price | कॅफे कॉफी डे एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. 2 दिवसांच्या सलग किरकोळ घसरणीनंतर आज पुन्हा एकदा हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कॅफे कॉफी डे एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह 51.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स मोठ्या घसरणीसह 43 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

वास्तविक, कॅफे कॉफी डे ग्लोबल लिमिटेड आणि IndusInd बँक यांनी एक करार केला आहे. म्हणून शेअर बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये पुन्हा एकदा विश्वास जागृत झाला आहे. आज गुरूवार दिनांक 14 सप्टेंबर 2023 रोजी कॅफे कॉफी डे एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 4.59 टक्के वाढीसह 53.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

सीडीजीएल आणि इंडसइंड बँक करार

कॉफी डे ग्लोबल लिमिटेड आणि त्यांना कर्ज देणारी IndusInd बँक यांनी एक करार केला आहे. या करारानुसार राष्ट्रीय कंपनी कायदा अपील न्यायाधिकरणाने म्हणजेच NCLAT ने कॅफे कॉफी डे एंटरप्रायझेस कंपनीविरुद्ध चालू असलेले दिवाळखोरीचे प्रकरण रद्द करण्याचा आदेश दिला आहे. कॅफे कॉफी डे एंटरप्रायझेस ही कंपनी मुख्यतः कॅफे कॉफी डे नावाची कॉफी चेन कॅफे चालवते. CDGL आणि IndusInd बँकेच्या वकिलांनी बुधवारी NCLAT च्या चेन्नई खंडपीठाला त्यांच्यात झालेल्या सेटलमेंटबाबत अपडेट कमावली आहे.

यासह कंपनीने NCLAT कडे प्रलंबित दिवाळखोरी प्रकरण रद्द करण्याची विनंती केली आहे. न्यायमूर्ती एम वेणुगोपाल आणि श्रीशा मेर्ला यांच्या दोन सदस्यीय खंडपीठाने दोन्ही पक्षाच्या युक्तिवादानुसार सीडीजीएल कंपनीचे दिवाळखोरी प्रकरण रद्द केले आहे.

दिवाळखोरी कारवाईला स्थगिती

11 ऑगस्ट 2023 रोजी, NCLAT ने एक अंतरिम आदेश जारी करून CDGL कंपनी विरुद्ध सुरू असलेली दिवाळखोरीची थांबवली आहे. एनसीएलटीच्या या आदेशाला सीडीजीएलच्या संचालक आणि दिवंगत व्हीजी सिद्धार्थ यांच्या पत्नी मालविका हेगडे यांनी अपीलीय न्यायाधिकरणासमोर आव्हान दिले होते.

20 जुलै 2023 रोजी, एनसीएलटीच्या बेंगळुरू खंडपीठाने कॅफे कॉफी डे एंटरप्रायझेस कंपनीला 94 कोटी रुपये कर्ज देणाऱ्या इंडसइंड बँकेने थकबाकी असलेल्या कर्जाची वसुली करण्यासाठी जी याचिका दाखल केली होती, त्यावर NCLT ने निर्णय जाहीर केला होता. याशिवाय एनसीएलटीने आपल्या आदेशाद्वारे कॅफे कॉफी डे एंटरप्रायझेस कंपनीच्या संचालक मंडळाला निलंबित करून शैलेंद्र अजमेरा यांना अंतरिम ठराव व्यावसायिक म्हणून नियुक्त केले आहे.

कंपनी बद्दल थोडक्यात

CDGL कंपनी भारतात विविध 154 शहरांमध्ये 469 कॅफे चालवत आहे. CDGL कंपनीने फेब्रुवारी 2019 मध्ये 115 कोटी रुपये अल्पकालीन कर्ज घेतले होते. CDGL ची मूळ कंपनी असलेल्या कॉफी डे एंटरप्रायझेस लिमिटेडच्या वार्षिक अहवालानुसार, CDGL कंपनीद्वारे भारतातील विविध 154 शहरांमध्ये 469 कॅफे चालवले जात आहेत. यासह कंपनी विविध शहरात 268 CCD व्हॅल्यू एक्सप्रेस किओस्क देखील चालवत आहे. या किओस्कमध्ये कंपनीद्वारे 48,788 व्हेंडिंग मशीन ठेवण्यात आले आहेत जे कॉर्पोरेट ऑफीस आणि हॉटेल्समध्ये ब्रँडेड कॉफी विकतात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | CCD Share Price today on 14 September 2023.

हॅशटॅग्स

CCD Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x