13 May 2024 2:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 13 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल SBI Mutual Fund | कुटुंबातील लहान मुलांचं आयुष्य बदलेल ही SBI फंडाची खास योजना, अल्पावधीत 30 लाख रुपये मिळतील Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 13 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR भरण्यासाठी फॉर्म-16 का आवश्यक आहे? नसल्यास काय करायचं जाणून घ्या Tata Altroz | टाटा मोटर्सच्या प्रसिद्ध हॅचबॅक कार वर बंपर डिस्काउंट, शो-रुमध्ये ऑफर येताच बुकिंगला गर्दी Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी या बँका देत आहेत भरमसाठ व्याजदर, बचतीवर मोठा परतावा Bank Account Alert | फायद्यात राहा! बँक FD वर मिळतंय 9.1% पर्यंत व्याज, योग्य ठिकाणी पैसा गुंतवा
x

ITI Share Price | मार्ग श्रीमंतीचा! आयटीआय शेअर मालामाल करतोय, 5 दिवसात दिला 52 टक्के परतावा, पुढेही श्रीमंत करेल शेअर

ITI Share Price

ITI Share Price | आयटीआय लिमिटेड कंपनीच्या शेअरने फक्त दीर्घकालीन नाही, तर आपल्या अल्पकालीन गुंतवणूकदारांना देखील मजबूत कमाई करून दिली आहे. दळणवळण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या आयटीआय लिमिटेड कंपनी लॅपटॉप आणि मिनी पीसी बनवण्याचे काम करते. आयटीआय लिमिटेड ही सरकारी मालकीची कंपनी डेल, एचपी, एसर आणि लेनोवो या सारखा ग्लोबल ब्रँडसोबत देखील जोरदार स्पर्धा करत आहे. ही कंपनी टेलिकम्युनिकेशन उपकरणांचे व्यापार, सर्व्हिसिंग आणि उत्पादनाचे व्यवहार करते.

लेटेस्ट स्टॉक अपडेट

पूर्वी आयटीआय लिमिटेड कंपनी इंडियन टेलिफोन इंडस्ट्रीज लिमिटेड या नावाने ओळखली जात होती. आता ही कंपनी टेलिफोन संप्रेषण सेवा प्रदान करण्याचे काम करते. 12 सप्टेंबर 2023 रोजी ITI लिमिटेड कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 14 सप्टेंबर 2023 रोजी आयटीआय लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.83 टक्के घसरणसह 194.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

स्टॉकची कामगिरी आणि परतावा

मागील काही दिवसांमध्ये आयटीआय लिमिटेड कंपनीच्या शेअरने शानदार कामगिरी केली आहे. मागील पाच दिवसांत या कंपनीच्या शेअरची किंमत 52.46 टक्के वाढली आहे. 7 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 128.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज हा स्टॉक 194 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

मागील एका महिन्यात आयटीआय लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 69.28 टक्के नफा कमावून दिला आहे. 14 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 113.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 113.77 टक्के परतावा कमावून दिला आहे.

गुंतवणुकीवर परतावा

सहा महिन्यांपूर्वी म्हणजेच 13 मार्च 2023 रोजी आयटीआय लिमिटेड कंपनीचे शेअर्स 91.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 2023 या वर्षाच्या सुरुवातीला आयटीआय लिमिटेड स्टॉक 106.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. 20 वर्षांपूर्वी या कंपनीचे शेअर्स 20.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आयटीआय लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना सुरूवातीपासून आतपर्यंत 1,663.64 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | ITI Share Price today on 14 September 2023.

हॅशटॅग्स

#ITI Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x