12 May 2024 3:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank Account Alert | फायद्यात राहा! बँक FD वर मिळतंय 9.1% पर्यंत व्याज, योग्य ठिकाणी पैसा गुंतवा Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या New Tax Regime Slab | पगारदारांनो! नव्या टॅक्स प्रणालीचे 8 फायदे, इन्कम टॅक्स स्लॅब ते स्टँडर्ड डिडक्शन तपशील नोट करा Post Office Interest Rate | या योजनेत ज्येष्ठ नागरिकांचा दैनंदिन खर्च भागेल, व्याजातून मिळतील रु.10,250 My EPF Money | नोकरदारांनो! जॉब बदलला आहे? तुमच्या EPF संबंधित हे काम करा, अन्यथा पैशाचे नुकसान अटळ Post Office Scheme | फायदाच फायदा! पोस्ट ऑफिसच्या स्कीममध्ये महिना रु.1,000 गुंतवा, मिळतील रु. 8,24,641 Quant Mutual Fund | पगारदारांनो! बँक FD नव्हे, या 10 SIP योजना 40 टक्केपर्यंत परतावा देऊन पैसा वाढवतील
x

Jupiter Hospital Share Price | IPO ची कमाल! ज्युपिटर लाईफ लाईन हॉस्पिटल्स IPO ने एका दिवसात 32% परतावा दिला

Jupiter Hospital Share Price

Jupiter Hospital Share Price | ज्युपिटर लाईफ लाईन हॉस्पिटल्स कंपनीच्या आयपीओ स्टॉकने शेअर बाजारात जबरदस्त एंट्री मारली आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ज्युपिटर लाईफ लाईन हॉस्पिटल्स कंपनीचे शेअर्स 973 रुपये किमतीवर सूचिबद्ध झाले होते. या कंपनीच्या IPO स्टॉकने आपल्या इश्यू किमतीच्या तुलनेत 32 टक्के प्रीमियमसह लिस्टिंग केली आहे.

ज्युपिटर लाईफ लाइन हॉस्पिटल्स कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 735 रुपये निश्चित केली होती. आज बुधवार दिनांक 20 सप्टेंबर 2023 रोजी ज्युपिटर लाईफ लाईन हॉस्पिटल्स कंपनीचे शेअर्स 2.03 टक्के घसरणीसह 1,053.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

या हॉस्पिटल चेन कंपनीच्या IPO चा आकार 869 कोटी रुपये होता. या कंपनीचा IPO एकूण 63.72 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार ज्युपिटर लाईफ लाईन हॉस्पिटल्स कंपनीच्या IPO मध्ये क्यूआयबी गटातील जोरदार बोलीमुळे या IPO स्टॉकची मजबूत लिस्टिंग झाली आहे.

ज्युपिटर लाईफ लाईन हॉस्पिटल्स कंपनीच्या IPO मध्ये QIB चा राखीव कोटा 187 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. आपल्या IPO मध्ये ज्युपिटर लाईफ लाईन हॉस्पिटल्स कंपनीने 542 कोटी रुपये मूल्याचे फ्रेश शेअर जारी केले होते. आणि कंपनीच्या प्रवर्तकांनी 44.5 लाख इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत विकले होते.

ज्युपिटर लाईफ लाईन हॉस्पिटल्स कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 695-735 रुपये जाहीर केली होती. आता या कंपनीने आपले सर्व फेडून कर्जमुक्त होण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. ज्युपिटर लाईफ लाईन हॉस्पिटल्स कंपनी आपल्या IPO मधून जमा झालेली रक्कम कर्ज परतफेड करण्यासाठी खर्च करणार आहे.

या कंपनीने IPO लाँच करण्यापूर्वी अँकर गुंतवणूकदारांकडून 261 कोटी रुपये भांडवल उभारणी केली होती. या फेरीत गोल्डमन सॅक्स, फिडेलिटी फंड, अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी, नोमुरा, निप्पॉन इंडिया एमएफ, एचडीएफसी एमएफ यासारख्या दिग्गज गुंतवणूक संस्थांनी भाग घेतला होता.

ज्युपिटर लाईफ लाईन हॉस्पिटल्स ही कंपनी 2007 साली स्थापन झाली होती. या कंपनीने आपले पहिले हॉस्पिटल ठाण्यामध्ये सुरू केले होते. ही कंपनी 15 वर्षांपेक्षा अधिक काळापासून भारताच्या पश्चिम भागात एक अग्रगण्य आरोग्य सेवा प्रदाता म्हणून नावाजलेली आहे. ही कंपनी महाराष्ट्रात ठाणे, पुणे आणि मध्यप्रदेशमध्ये इंदूर शहरात ज्युपिटर हॉस्पिटल या ब्रँड नावाने व्यवसाय करते.

आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीने मागील वर्षीच्या तुलनेत 42.6 टक्क्यांच्या वाढीसह 72.9 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तर मागील वर्षीच्या तुलनेत कंपनीने जून तिमाहीत 21.7 टक्क्यांच्या वाढीसह 892.5 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. जून तिमाही काळात कंपनीचा EBITDA 31.2 टक्क्यांच्या वाढीसह 201.3 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Jupiter Hospital Share Price today on 20 September 2023.

हॅशटॅग्स

Jupiter Hospital Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x