21 May 2024 2:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 26 रुपयाचा रिलायन्स पॉवर शेअर खिसा पैशाने भरतोय, स्टॉकची जोरदार खरेदी IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी मिळेल मल्टिबॅगर परतावा, अशी संधी सोडू नका Infosys Share Price | कमाईची संधी सोडू नका! Infosys आणि TCS सहित हे 7 शेअर्स मजबूत परतावा देणार Hot Stocks | पैशाचा पाऊस पाडणारे 9 स्वस्त पेनी शेअर्स, अवघ्या 5 दिवसात 82 टक्केपर्यंत परतावा मिळतोय Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल मजबूत परतावा Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, संधी सोडू नका Home Loan Down Payment | पगारदारांनो! गृहकर्जासाठी डाऊन पेमेंटची रक्कम सहज मॅनेज होईल, फॉलो करा या टिप्स
x

Ashoka Buildcon Share Price | मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या अशोका बिल्डकॉन कंपनीला महाराष्ट्र सरकारकडून मोठा कॉन्ट्रॅक्ट, शेअर तेजीत

Ashoka Buildcon Share Price

Ashoka Buildcon Share Price | अशोका बिल्डकॉन लिमिटेड कंपनीला महाराष्ट्र शासनाने कोट्यवधी रुपये मूल्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ही बातमी येताच कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी खरेदी पाहायला मिळाली होती. अशोका बिल्डकॉन कंपनीच्या शेअरने मागील काही महिन्यात आपल्या पोझिशनल गुंतवणूकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे.

आता महाराष्ट्र सरकारने दिलेल्या नवीन काँट्रॅक्टमुळे कंपनीवर गुंतवणूकदारांनी अधिक विश्वास टाकला आहे. आज गुरूवार दिनांक 21 सप्टेंबर 2023 रोजी अशोका बिल्डकॉन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.047 टक्के घसरणीसह 105.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

नुकताच अशोका बिल्डकॉन कंपनीला महाराष्ट्र सरकारने 645.70 कोटी रुपये मूल्याचे एक कॉन्ट्रॅक्ट दिले आहे. सेबीला दिलेल्या माहितीत अशोका बिल्डकॉन लिमिटेड कंपनीने सांगितले आहे की, कंपनीला महाराष्ट्र शासनाच्या विद्युत मंडळाकडून 645.70 कोटी रुपये मूल्याचे काम मिळाले आहे.

या कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत अमरावती परिमंडळात 167.02 कोटी रुपये मूल्याचे काम होणे अपेक्षित आहे. आणि नाशिक नागरी परिमंडळात 134.43 कोटी रुपये मूल्याचे काम होणे अपेक्षित आहे. तर नाशिक परिमंडळात 170.99 कोटी रुपये आणि उस्मानाबाद परिमंडळात 176.26 कोटी रुपये मूल्याचे काम होणे अपेक्षित आहे.

या नवीन वर्क ऑर्डरची माहिती जाहीर करताच अशोका बिल्डकॉन लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली होती. बुधवारी या कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या वाढीसह 109.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 116.50 रुपये आहे.

अशोका बिल्डकॉन कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 25 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. आणि मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 40 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात अशोका बिल्डकॉन लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत 5 टक्के वाढली आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 70.10 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Ashoka Buildcon Share Price today on 21 September 2023.

हॅशटॅग्स

Ashoka Buildcon Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x