16 May 2024 12:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टेक्निकल सेटअपवर टाटा पॉवर स्टॉक मजबूत, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांसाठी खुशखबर! FD व्याजदर वाढले, किती फायदा होणार पटापट तपासून घ्या SBI Mutual Fund | पगारातून बचत करा! SBI म्युच्युअल फंडाच्या 'या' योजना मालामाल करतील, बचत अवघी रु. 500 Post Office Scheme | मोठी कमाई करा! या योजनेत 500 रुपयांची बचत सुरु करा, मिळेल 9,76,370 रुपये परतावा Income Tax Returns | पगारदारांनो! तुमचा पगार इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये येत नसेल तरी ITR करा, मिळतील 'हे' फायदे Nippon India Mutual Fund | बँक FD पेक्षा नोकरदार वर्ग या फंडात पैसे गुंतवतो, लो-रिस्क आणि फायदा मोठा मिळतोय Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या
x

Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, अक्षय ऊर्जा क्षेत्रातील वाढ फायद्याची ठरणार? स्टॉक टार्गेट प्राईस किती असेल?

Tata Power Share Price

Tata Power Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी कंपनीने नेपाळमधील अक्षय ऊर्जा संबंधित पायाभूत सेवा निर्माण करण्यासाठी स्थानिक कंपनी डूगर पॉवरसोबत सामंजस्य करार केला आहे. या कराराच्या माध्यमातून नेपाळमधील अक्षय ऊर्जा क्षेत्रात TPREL कंपनीने धोरणात्मक प्रवेश केला आहे.

या कराराच्या माध्यमातून नेपाळचमधील अक्षय ऊर्जा विकासाला गती देण्यासाठी एक महत्त्वाचा. टप्पा म्हणून पाहिले जात आहे. आज शुक्रवार दिनांक 22 सप्टेंबर 2023 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 0.14 टक्के वाढीसह 257.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी कंपनीने दिलेल्या निवेदनानुसार, कंपनीने नेपाळच्या आघाडीच्या औद्योगिक समूह डूगर लिमिटेडच्या उपकंपनी असलेल्या Dugar Power Private Limited कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे. हा करार ऑन आणि ऑफ ग्रीड ऊर्जा उपाय श्रेणी तयार करण्यासाठी, आणि परिवर्तनशील सौर ऊर्जा तंत्रज्ञानाचा वापर करण्यासह, स्थानिक पातळीवरील ऊर्जा निर्मितीतील दीर्घकालीन वचनबद्धतेसाठी उपयोगी ठरणार आहे. हा करार नेपाळच्या विविध ऊर्जा गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे.

टाटा पॉवर कंपनी लिमिटेडची उपकंपनी असलेल्या टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी कंपनीने अक्षय ऊर्जा क्षेत्रात आपले मजबूत स्थान निर्माण केले आहे. या कंपनीने जागतिक स्तरावर 3GW पेक्षा जास्त क्षमतेचे सेल आणि मॉड्यूल पुरवठा केला आहे. कंपनीच्या CEO च्या मते डूगर पॉवर कंपनी सोबतची भागीदारी नेपाळच्या अक्षय ऊर्जा गरजेची पूर्तता करण्यासंबंधित एक धोरणात्मक युती आहे.

डूगर पॉवर कंपनीच्या मते TPREL कंपनी सोबतची युती ही नेपाळचे अक्षय ऊर्जा आणि ऊर्जा स्वावलंबनाचे दीर्घकालीन उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मदत करेल. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांनी कमजोर झाले होते. टाटा पॉवर कंपनीचे एकूण बाजार भांडवल 81,976.44 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Power Share Price today on 22 September 2023.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x