18 May 2024 1:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी स्टॉकची यादी सेव्ह करा Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा स्टॉक हाय रिस्क, हाय रिवॉर्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी शेअरबाबत मोठे संकेत दिले RVNL Share Price | RVNL स्टॉकमध्ये तुफान तेजी, शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने धावतोय, फायदा घेणार? Wipro Share Price | विप्रो स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआऊटचे संकेत, मोठी कमाई होणार, टार्गेट प्राइस जाणून घ्या Ashok Leyland Share Price | मालामाल करणाऱ्या स्टॉकच्या खरेदीला ऑनलाईन गर्दी, तज्ज्ञांचा शेअर्स खरेदीचा सल्ला Infosys Share Price | इन्फोसिस शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक स्वस्तात विकत घ्यावा? Hold करावा की Sell करावा? Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR करताना 'या' 10 चुका टाळा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा
x

IFCI Share Price | मजबूत कमाईसाठी वडापाव किंमतीचे शेअर्स शोधताय? IFCI शेअर आहे स्वस्त, अल्पावधीत 167% परतावा दिला

IFCI Share Price

IFCI Share Price | आजकाल भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पहायला मिळत आहे. मात्र शेअर बाजारात असे काही शेअर्स आहेत, ज्यानी अल्पावधीत आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. असाच एक स्टॉक आहे, आयएफसीआय लिमिटेड कंपनीचा. काही दिवसांपूर्वी आयएफसीआय लिमिटेड कंपनीचे शेअर्स 10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 25 रुपये किमतीच्या आसपास ट्रेड करत आहे.

भारतीय उद्योगांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारने IFCI कंपनीची स्थापना केली होती. मात्र हळुहळू या कंपनीने उद्योगांना भरपूर कर्ज वाटप केले, आणि कंपनीचा एनपीए वाढत गेला. यामुळे आयएफसीआय कंपनीचे शेअर्स 10 रुपये किमतीच्या खाली ट्रेड करत होते. एके काळी या कंपनीचे शेअर्स 100 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 28 सप्टेंबर 2023 रोजी आयएफसीआय लिमिटेड स्टॉक 0.62 टक्के वाढीसह 24.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

भारत सरकारच्या अनेक प्रयत्नांनंतर आयएफसीआय कंपनीची आर्थिक स्थिती आता सुधारत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये IFCI कंपनीचे शेअर्स 12 टक्क्यांच्या वाढीसह 24.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या शेअरची दैनिक नीचांक किंमत पातळी 22.05 रुपये होती. तर दैनिक उच्चांक किंमत पातळी 24.95 रुपये होती. मागील 1 आठवड्यात आयएफसीआय लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 32.44 टक्के नफा कमावून दिला आहे.

मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 68.60 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील तीन महिन्यांत या स्टॉकची किंमत 112.02 टक्के वाढली आहे. तर मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांच्या गुंतवणुकीचे मूल्य 152.04 टक्के वाढवले आहेत. मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 311.67 टक्के नफा कमावून दिला आहे.

IFCI कंपनीच्या शेअर्सचे दर्शनी मूल्य 10 रुपये आहे. आणि या कंपनीचे बाजार भांडवल 6,149 कोटी रुपये आहे. IFCI कंपनीच्या शेअर्सचे बुक व्हॅल्यू 12.87 रुपये आहे. IFCI लिमिटेड म्हणजेच इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीची स्थापना 1948 साली झाली होती.

परंतु 1993 साली औद्योगिक वित्त निगम कायदा रद्द केल्यानंतर IFCI ही कंपनी पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये रुपांतरीत झाली होती. IFCI ही कंपनी RBI मध्ये सरकारी नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी म्हणून रजिस्टर करण्यात आली आहे. IFCI ची स्थापना कंपनी कायदा 2013 च्या कलम 2(72) अंतर्गत सार्वजनिक वित्तीय संस्था म्हणून स्थापन झाली होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IFCI Share Price today on 28 September 2023.

हॅशटॅग्स

IFCI Share Price(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x