18 May 2024 5:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स चार्टनुसार तज्ज्ञांचं महत्वाचं विधान, येस बँक स्टॉकबाबत गुंतवणूकदारांना काय सल्ला दिला?

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | येस बँक स्टॉक गुरुवार दिनांक 28 सप्टेंबर 2023 रोजी तेजीसह हिरव्या निशाणीवर ओपन झाले होते. दिवसभराच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँक स्टॉक 1.8 टक्के वाढीसह 17.70 रुपये किमतीवर पोहोचली होती. मात्र नंतर स्टॉकला ही तेजी टिकवून ठेवता आली नाही.

शेवटच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँक स्टॉक 0.29 टक्क्यांच्या घसरणीसह 17.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. येस बँकेचे शेअर्स 24.75 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीपेक्षा 30 टक्क्यांनी खाली ट्रेड करत आहेत. शुक्रवार दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी येस बँक स्टॉक 17.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांचे मत
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते येस बँकेचे शेअर्स गुंतवणुकीसाठी जास्त आकर्षक नाहीये. आणि तज्ञांनी देखील स्टॉकबाबत फारसा उत्साह व्यक्त केला नाहीये. तज्ञांच्या मते ज्या गुंतवणूकदारांकडे येस बँक शेअर्स आहेत, त्यांनी प्रॉफिट बुक करून बाहेर पडलेले बरे. येस बँकेच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे.

त्यामुळे बरेच गुंतवणूकदार येस बँक स्टॉकमध्ये वरील किमतीवर अडकले आहेत. मागील 3-4 वर्षांच्या स्टॉक चार्टवर नजर टाकली तर आपल्याला समजेल की, येस बँक स्टॉक 12 रुपये ते 24-25 रुपयांच्या रेंजमध्येच अडकला आहे.

शेअर बाजारातील बऱ्याच गुंतवणूकदारांना असे वाटते की, येस बँक स्टॉक जोपर्यंत तो 24-25 रुपये किंमत श्रेणी ओलांडत नाही तोपर्यंत या स्टॉकमध्ये मोठी वाढ होणे अवघड आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी येस बँक स्टॉकमध्ये संयम बाळगावा किंवा प्रॉफिट/लॉस बुक करून बाहेर पडावे, असा सल्ला तज्ञांनी दिला आहे. मागील अडीच ते तीन वर्षांपासून येस बँक स्टॉक आपली अप्पर सपोर्ट किंमत ओलांडू शकला नाहीये.

येस बँकेच्या शेअर्सने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना 2.67 टक्के परतावा मामावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत येस बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 15.72 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 11.61 टक्के नफा कमावून दिला आहे. येस बँकेचे बाजार भांडवल 49,520 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yes Bank Share Price 30 September 2023.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x