18 May 2024 3:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये ब्रेकआउटचे संकेत, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राइस, किती फायदा? Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी स्टॉकची यादी सेव्ह करा Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा स्टॉक हाय रिस्क, हाय रिवॉर्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी शेअरबाबत मोठे संकेत दिले
x

TCS Share Buyback | टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने शेअर्स बायबॅक ऑफर जाहीर केली, फायदा घेणार का?

TCS Share Buyback

TCS Share Buyback | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीच्या शेअरने नुकताच आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1 टक्के वाढीसह 3660 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीचे बाजार भांडवल 13.39 लाख कोटी रुपयेवर पोहचले आहेत. आज मंगळवार दिनांक 10 ऑक्टोबर 2023 रोजी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 0.24 टक्के घसरणीसह 3,629.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

11 ऑक्टोबर 2023 रोजी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनी आपले 2023-24 या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे. यासह कंपनीने बाय बॅक ऑफर देखील जाहीर केली आहे. ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीने आपल्या अहवालात म्हंटले आहे की तज्ञांना टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीच्या बायबॅक ऑफरचा अंदाज होता, त्यामुळे TCS कंपनीच्या शेअर्समध्ये लक्षणीय हालचाल पाहायला मिळाली नाही.

बुधवार दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रोजी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनी तिमाही निकालांसह शेअर बायबॅक ऑफर जाहीर करणार आहे. 2022 मध्ये देखील TCS कंपनीने 18000 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स बाय बॅक केले होते.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही भारतील सर्वात मोठी IT कंपनी 11 ऑक्टोबर रोजी चालू आर्थिक वर्षाच्या जुलै ते सप्टेंबर 2023 तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे. भारतातील दुसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी इन्फोसिस आणि तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी आयटी कंपनी विप्रोने देखील शेअर बाय बॅक करण्याची घोषणा केली होती.

इन्फोसिस कंपनीने फेब्रुवारी 2023 मध्ये 9300 कोटी रुपये मूल्याचे 6.004 कोटी शेअर्स बायबॅक केले होते. तर विप्रो कंपनीने जून 2023 मध्ये 12000 कोटी रुपये मूल्याचे शेअर बायबॅक केले होते. जागतिक आर्थिक मदीच्या काळात IT कंपन्यांच्या तिमाही निकालांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर, TCS कंपनीचा बायबॅक कंपनीच्या शेअर्सला चालना देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | TCS Share Buyback today on 10 October 2023.

हॅशटॅग्स

TCS Share Buyback(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x