17 May 2024 2:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, संधी सोडू नका Rajnish Retail Share Price | अवघ्या 63 पैशाचा शेअर! 4 वर्षात दिला 14000% परतावा, स्टॉक आजही स्वस्त आणि फायद्याचा Suzlon Share Price | सुझलॉन स्टॉक ब्रेकआऊट लेव्हल अपडेट, शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा सल्ला काय? IREDA Share Price | तज्ज्ञांचा IREDA शेअर्स 'Hold' चा सल्ला, या प्राईसवर मजबूत सपोर्ट, पुढची टार्गेट प्राईस जाहीर HDFC Mutual Fund | अबब! जबरदस्त म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 9.57 कोटी रुपये परतावा दिला Gold Rate Today | टेन्शन वाढलं! आज सोन्याचा भाव अजून महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या My EPF Money | पगारदारांनो! तुमच्या खात्यातही पैसे जमा झाले असतील तर पटापट तपासून घ्या, नियम बदलला
x

Avantel Share Price | मागील 2 दिवसात अवांटेल शेअरने गुंतवणुकदारांना 25% परतावा दिला, त्यासाठी अल्पावधीत 256%, पुढे किती मिळेल?

Avantel Share Price

Avantel Share Price | अवांटेल लिमिटेड या टेलिकॉम कंपनीच्या शेअर्सने बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये नवीन उच्चांक किंमत स्पर्श केली होती. आज मात्र या कंपनीच्या शेअरमध्ये किंचित विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. अवांटेल लिमिटेड कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 6 टक्क्यांच्या वाढीसह 343.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

मागील 2 दिवसात अवांटेल लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 25 टक्के परतावा कमावून दिला आहे. अवांटेल लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे.

अवांटेल लिमिटेड कंपनीने आपल्या शेअर धारकांना एका शेअरवर 2 बोनस शेअर्स मोफत देण्याची घोषणा केली आहे. आज गुरूवार दिनांक 12 ऑक्टोबर 2023 रोजी अवांटेल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.65 टक्के घसरणीसह 329.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अवांटेल लिमिटेड कंपनीने सेबीला कळवले आहे की, कंपनीने आपल्या शेअर धारकांना 2 : 1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच कंपनी 1 शेअरवर 2 बोनस शेअर्स वाटप करणार आहे. अवांटेल लिमिटेड या टेलिकॉम कंपनीने अद्याप बोनस शेअर्सची रेकॉर्ड डेट जाहीर केलेली नाहीये. यापूर्वी अवांटेल लिमिटेड कंपनीने जून 2022 मध्ये आपल्या शेअर धारकांना 3 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते.

मागील 6 महिन्यांत अवांटेल लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 259 टक्के परतावा कमावून दिला आहे. 12 एप्रिल 2023 रोजी अवांटेल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 92.92 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 11 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 343.30 रुपये किमतीवर पोहोचले होते.

2023 या वर्षात अवांटेल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 335 टक्के मजबूत झाले आहेत. 2 जानेवारी 2023 रोजी अवांटेल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 76.88 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात अवांटेल लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 433 टक्के परतावा कमावून कला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 58.80 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Avantel Share Price NSE 12 October 2023.

हॅशटॅग्स

#Avantel Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x