17 May 2024 12:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | अबब! जबरदस्त म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 9.57 कोटी रुपये परतावा दिला Gold Rate Today | टेन्शन वाढलं! आज सोन्याचा भाव अजून महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या My EPF Money | पगारदारांनो! तुमच्या खात्यातही पैसे जमा झाले असतील तर पटापट तपासून घ्या, नियम बदलला Shukra Rashi Parivartan | 'या' 3 नशीबवान राशीत तुमची राशी आहे का? शुक्र राशी परिवर्तन ठरणार अत्यंत भाग्यशाली SBI Mutual Fund | पगारदारांनो! या खास योजना तुम्हाला अल्पावधीत 22 लाख रुपयेपर्यंत परतावा देतील, यादी सेव्ह करा Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली
x

Rudra Global Share Price | मालामाल शेअर! मागील 9 दिवसात या शेअरने 29 टक्के परतावा दिला, आता नवीन टार्गेट प्राईस पहा

Rudra Global Share Price

Rudra Global Share Price | रुद्र ग्लोबल इन्फ्रा प्रॉडक्ट्स कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. मागील 9 ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 29 टक्के मजबूत झाले आहेत. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात आणखी वाढू शकतात.

मागील आठवड्यात शुक्रवार दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोजी, रुद्र ग्लोबल इन्फ्रा प्रॉडक्ट्स कंपनीचे शेअर्स 4.49 टक्क्यांच्या वाढीसह 138.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज सोमवार दिनांक 16 ऑक्टोबर 2023 रोजी रुद्र ग्लोबल इन्फ्रा प्रॉडक्ट्स स्टॉक 4.98 टक्के वाढीसह 145.50 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

रुद्रा ग्लोबल इन्फ्रा प्रॉडक्ट्स ही कंपनी मुख्यतः थर्मो मेकॅनिकली ट्रिटेड टीएमटी बार आणि माईल्ड स्टील एमएस बिलेट्स बनवण्याचे आलं करते. बिलेट्सचा वापर मुख्यतः टीएमटी बार बनवण्यासाठी होतो. या कंपनीचा कारखाना गुजरात राज्यात भावनगर याठिकाणी स्थित आहे. आणि कंपनीची वार्षिक क्षमता 2.50 लाख टन आहे. भारत सरकारने आता पायाभूत सुविधांचा विकास करण्याचा सपाटा सुरू केला आहे. याचा फायदा रुद्र ग्लोबल इन्फ्रा प्रॉडक्ट्स कंपनीला देखील होणार आहे.

ब्रोकरेज फर्म प्रॉफिटमार्टच्या तज्ञांनी रुद्र ग्लोबल इन्फ्रा प्रॉडक्ट्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आणि त्यासाठी तज्ञांनी स्टॉकवर 177 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. ही लक्ष्य किंमत शेअर्सच्या सध्याच्या किंमत पातळीच्या तुलनेत 28 टक्के अधिक आहे.

16 फेब्रुवारी 2023 रोजी रुद्र ग्लोबल इन्फ्रा प्रॉडक्ट्स कंपनीचे शेअर्स 54.25 रुपये या आपल्या वार्षिक नीचांक किंमतीवर ट्रेड करत होते. तर मागील 6 महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 172 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. 10 ऑगस्ट 2023 रोजी रुद्र ग्लोबल इन्फ्रा प्रॉडक्ट्स कंपनीचे शेअर्स आपल्या चार वर्षांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते.

मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 33.49 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात रुद्र ग्लोबल इन्फ्रा प्रॉडक्ट्स कंपनीच्या शेअरची किंमत 37 तक्के वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Rudra Global Share Price NSE 16 October 2023.

हॅशटॅग्स

Rudra Global Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x