18 May 2024 7:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Piccadily Agro Share Price | या दारू कंपनीच्या शेअरमध्ये पैसा ओता, शेअर गुंतवणूदारांना करोडपती करतोय, रोज अप्पर सर्किटवर

Piccadily Agro Share Price

Piccadily Agro Share Price | पिकाडिली अॅग्रो इंडस्ट्री लिमिटेड या हरियाणातील मद्य कंपनीच्या शेअर्सने गुंतवणुकदारांमध्ये पैशाची नशा पसरवली आहे. मागील काही दिवसांपासून पिकाडिली अॅग्रो इंडस्ट्री लिमिटेड कंपनीचे शेअर्स सतत अप्पर सर्किट तोडत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात विक्रीचा दबाव असताना देखील पिकाडिली अॅग्रो इंडस्ट्री लिमिटेड कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. Piccadily Share Price

आज देखील या कंपनीचे शेअर अप्पर सर्किटमध्ये अडकले आहेत. मागील 5 दिवसात पिकाडिली अॅग्रो इंडस्ट्री लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 40 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 182 टक्के वाढवले आहेत.  मंगळवार दिनांक 17 ऑक्टोबर 2023 रोजी पिकाडिली अॅग्रो इंडस्ट्री लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 312.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील सहा महिन्यांत पिकाडिली अॅग्रो इंडस्ट्री लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. ज्या गुंतवणूकदारानी सहा महिन्यांपूर्वी पिकाडिली अॅग्रो लिमिटेड स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 6 लाखांपेक्षा जास्त झाले आहेत.

2023 या यावर्षात पिकाडिली अॅग्रो इंडस्ट्री लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 575 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात पिकाडिली अॅग्रो इंडस्ट्री लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत 656 टक्के वाढली आहे. तर मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 2181 टक्के नफा कमावून दिला आहे.

ज्या गुंतवणूकदारांनी पिकाडिली अॅग्रो इंडस्ट्री लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करून संयम राखला होता, ते लोक आता करोडपती झाले आहेत. ज्या गुंतवणूकदारांनी 1997 साली पिकाडिली अॅग्रो इंडस्ट्री लिमिटेड कंपनीच्या शेअरवर 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 118,920.00 टक्के वाढून 11.90 कोटी रुपये झाले आहे. 26 वर्षांपूर्वी या कंपनीचे शेअर्स फक्त 25 पैसेवर ट्रेड करत होते. काही दिवसांपूर्वी, पिकाडिली ऍग्रो कंपनीला जगातील सर्वोत्तम सिंगल माल्ट व्हिस्कीचा जागतिक पुरस्कार मिळाला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Piccadily Agro Share Price NSE 17 October 2023.

हॅशटॅग्स

Piccadily Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x