18 May 2024 3:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये ब्रेकआउटचे संकेत, तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राइस, किती फायदा? Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी स्टॉकची यादी सेव्ह करा Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा स्टॉक हाय रिस्क, हाय रिवॉर्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी शेअरबाबत मोठे संकेत दिले
x

Gold Rate Today | चिंता वाढली! आज दिवाळीपूर्वी सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील 10 ग्रॅम सोन्याचे नवे दर तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | सलग 2 दिवसांच्या घसरणीनंतर आज सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोनं महाग झालं आहे. यासोबतच चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज सोन्याचा भाव 59600 च्या वर व्यवहार करत आहे. Gold Price Today

आज सराफा बाजारात सोनं किती स्वस्त?
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटनुसार, आज सोन्याचा भाव 59636 रुपये प्रति 10 ग्रॅम वर खुला झाला आहे. तर आदल्या दिवशी तो 59283 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. त्यामुळे आज सोने 353 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या वाढीसह उघडले आहे.

आज सोन्याचा भाव उच्चांकी पातळीपेक्षा किती स्वस्त?
सध्या सोन्याचा भाव आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपेक्षा 1,949 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त आहे. 11 मे 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोने प्रति दहा ग्रॅम ६१५८५ रुपयांवर गेले होते.

आज चांदीचा भाव प्रति किलो ७१८४७ रुपयांवर खुला झाला आहे. आदल्या दिवशी चांदी 70846 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती. त्यामुळे चांदीच्या दरात आज प्रति किलो १००१ रुपयांची वाढ झाली आहे. चांदी 4617 रुपयांच्या उच्चांकी पातळीच्या खाली व्यवहार करत आहे. 4 मे 2023 रोजी चांदीने 76464 रुपयांचा उच्चांक गाठला होता.

आज तुमच्या शहरातील सोन्याचे दर किती

Gold Rate Today Aurangabad
औरंगाबाद, 22 कॅरेट सोने : 55450 रुपये, 24 कॅरेट सोने : 60490 रुपये

Gold Rate Today Mumbai
मुंबई, 22 कॅरेट सोने : 55450 रुपये, 24 कॅरेट सोने : 60490 रुपये

Gold Rate Today Nagpur
नागपूर, 22 कॅरेट सोने : 55450 रुपये, 24 कॅरेट सोने : 60490 रुपये

Gold Rate Today Nashik
नाशिक, 22 कॅरेट सोने : 55480 रुपये, 24 कॅरेट सोने : 60520 रुपये

Gold Rate Today Pune
पुणे, 22 कॅरेट सोने : 55450 रुपये, 24 कॅरेट सोने : 60490 रुपये

Gold Rate Today Thane
ठाणे, 22 कॅरेट सोने : 55450 रुपये, 24 कॅरेट सोने : 60490 रुपये

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates check details on 18 October 2023.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(216)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x