19 May 2024 9:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या OPPO A59 5G | फक्त 12600 रुपयांत सर्वात स्वस्त 5G OPPO फोन, 128GB स्टोरेज आणि बरंच काही Tata Nexon | टाटा नेक्सॉन CNG व्हेरियंटमध्ये लवकरच लाँच होतंय, जाणून घ्या किती बदलणार SUV Swift Dzire Price | ब्रेकिंग! न्यू डिझायर कारची डिटेल्स फोटोसहित लीक, सर्व फीचर्स जाणून घ्या, 6 एअरबॅग्स HDFC Home Loan | पगारदारांनो! तुम्ही गृहकर्ज घेतलंय का? हे काम करा, व्याज कमी होईल आणि मॅनेज करणंही सोपं
x

Softtech Engineers Share Price | मालामाल व्हा! सॉफ्टटेक इंजिनिअर्स शेअरने अल्पावधीत दिला 200 टक्के परतावा, खरेदी करावा का?

Softtech Engineers Share Price

Softtech Engineers Share Price | सॉफ्टटेक इंजिनिअर्स कंपनीच्या शेअरमध्ये मागील काही दिवसांपासून तेजी पाहायला मिळत होती. आज मात्र या कंपनीच्या शेअरमध्ये नफा वसुली सुरू झाली आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सॉफ्टटेक इंजिनिअर्स स्टॉक 3 टक्क्याच्या वाढीसह 253 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 254 कोटी रुपये आहे. सॉफ्टटेक इंजिनिअर्स कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 287 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 121 रुपये होती.

मागील 5 दिवसांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 10 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. सॉफ्टटेक इंजिनिअर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने मागील 1 महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 44 टक्के नफा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी सॉफ्टटेक इंजिनिअर्स स्टॉक 3.99 टक्के घसरणीसह 243 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील 6 महिन्यांत सॉफ्टटेक इंजिनिअर्स स्टॉकची किंमत 150 रुपये किंमत पातळीवरून 70 टक्के वाढली आहे. सॉफ्टटेक इंजिनिअर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने जून 2023 मधील 90 रुपये या नीचांक किंमत पातळीच्या तुलनेत 160 रुपयेपेक्षा जास्त नफा दिला आहे. नुकताच सॉफ्टटेक इंजिनिअर्स कंपनीला एक मोठी ऑर्डर मिळाली होती. मागील तीन दिवसांत सॉफ्टेक इंजिनिअर्स कंपनीच्या शेअर्सबाबत गुंतवणूकदारांमध्ये उत्साह पाहायला मिळत होता. आज मात्र स्टॉकला उतरती कळा लागली आहे.

सॉफ्टटेक इंजिनिअर्स ही एक IT आणि सॉफ्टवेअर सेवा प्रदान करणारी कंपनी म्हणून ओळखली जाते. ही कंपनी आर्किटेक्चरल अभियांत्रिकी, बांधकाम क्षेत्रातील कंपन्यांना आपल्या सेवा प्रदान करते. यासह ही कंपनी मालमत्ता विकासक, महानगरपालिका, गुंतवणूकदार, रिअल इस्टेट कंपन्या, कंत्राटदार आर्किटेक्ट आणि सल्लागारांना देखील आपल्या सेवा प्रदान करून कमाई करते.

या कंपनीने विविध जागतिक दिग्गज कंपन्यांसोबत भागीदारी करार केला आहे. सॉफ्टटेक इंजिनिअर्स कंपनीने नुकताच आपले तिमाही निकाल जाहीर केले होते. त्यानंतर गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात स्टॉक खरेदी करायला सुरुवात केली.

2023-24 या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत, सॉफ्टटेक इंजिनिअर कंपनीने 55 टक्क्यांच्या वाढीसह 19 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. या तिमाहीत कंपनीने 5.33 कोटी रुपये कामकाजी नफा कमावला होता. आणि कंपनीने कर भरल्यानंतर 50 लाख रुपये निव्वळ माफ कमावला होता.

मागील 3 वर्षांत सॉफ्टेक इंजिनिअर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 200 टक्के परतावा कमावून दिला आहे. सॉफ्टटेक इंजिनिअर्स कंपनीच्या शेअर्सची किंमत 77 रुपये किंमत पातळीवरून 245 रुपये किमतीवर पोहचली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Softtech Engineers Share Price NSE 20 October 2023.

हॅशटॅग्स

Softtech Engineers Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x