19 May 2024 6:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांनी सुचवले 2 शेअर्स, 6 महीने दिला 200% परतावा, आता अल्पावधीत पुन्हा मोठी कमाई होईल

Stocks To Buy

Stocks To Buy | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळत होता. सेन्सेक्स इंडेक्स 247 अंकांच्या घसरणीसह 65629 अंकांवर ट्रेड करत होता. तर निफ्टी इंडेक्स 46 अंकांच्या घसरणीसह 19625 अंकांवर क्लोज झाला होता.

पश्चिम आशियात युध्द सुरू आहे, आणि हे युद्ध महायुद्धाचे रूपे धारण करते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने जगभरातील शेअर बाजारात विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. अशा मंदीच्या काळात गुंतवणूक करण्यासाठी तज्ञांनी ज्युपिटर वॅगन्स आणि फिनिक्स मिल्स स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

फिनिक्स मिल्स
शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीच्या शेअरवर 2000 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. गुंतवणूक करताना तज्ञांनी 1820 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. ही कंपनी भारतात विविध आठ शहरांमध्ये 10 मोठे मॉल्स चालवत आहे. याशिवाय ही कंपनी, व्यावसायिक आणि निवासी रिअल इस्टेट व्यवसाय क्षेत्रात देखील वेगाने उद्योग विस्तार करत आहे. या कंपनीचे मोठे प्रकल्प मुंबई, पुणे, बेंगळुरू आणि चेन्नई यासारख्या शहरात सुरू आहेत.

या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 2060 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 186 रुपये होती. आज शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.07 टक्के घसरणीसह 1,851.70 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

ज्युपिटर वॅगन्स
शेअर बाजारातील तज्ञांनी ज्युपिटर वॅगन्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी अल्प मुदतीसाठी 325 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. तज्ञांनी गुंतवणूकदारांना करताना या स्टॉकवर 300 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 318 रुपये होती.

हा कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 6000 कोटी रुपये आहे. ही कंपनी मुख्यतः भारतीय रेल्वेसाठी वॅगन बनवण्याचे काम करते. आज शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.096 टक्के घसरणीसह 311.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy for investment on 20 October 2023.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(283)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x