22 May 2024 10:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Salasar Techno Share Price | शेअर प्राईस 21 रुपये! 6 महिन्यात दिला 109% परतावा, यापूर्वी दिला 2590% परतावा Timken Share Price | 661 टक्के परतावा देणारा शेअर ओव्हरबॉट झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 22 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Narmada Agrobase Share Price | 24 रुपयाचा शेअर मालामाल करणार, सकारात्मक बातमी येताच स्टॉक खरेदीला गर्दी Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 4 शेअर्स खरेदी करा, स्टॉकने अवघ्या 5 दिवसांत दिला 71% परतावा Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Servotech Share Price | श्रीमंत बनवतोय हा शेअर! अवघ्या 3 वर्षात दिला 3270% परतावा, आली फायद्याची अपडेट
x

Cello World IPO | सेलो वर्ल्ड IPO ओपनिंगसाठी सज्ज, ग्रे मार्केटमध्ये शेअरची धमाल पहा, पहिल्याच दिवशी मिळेल मजबूत परतावा

Cello World IPO

Cello World IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. लवकरच सेलो वर्ल्ड ही कंपनी आपला IPO गुंतवणुकीसाठी खुला करणार आहे. या कंपनीचा IPO 30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2023 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला असेल. सेलो वर्ल्ड कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 617 ते 648 रुपये निश्चित केली आहे.

सेलो वर्ल्ड कंपनीचा आयपीओ अद्याप गुंतवणुकीसाठी खुला झाला नाहीये, मते या कंपनीच्या IPO स्टॉकला ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. ग्रे मार्केटची किंमत लक्षात घेता या कंपनीचे शेअर्स 750 रुपये किमतीवर सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे.

सेलो वर्ल्ड कंपनीचे शेअर्स सध्या ग्रे मार्केटमध्ये 105 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. जर सेलो वर्ल्ड कंपनीचे IPO शेअर्स 648 रुपये या अप्पर प्राइस बँडवर वाटप केले गेले तर या कंपनीचे शेअर्स 753 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. सेलो वर्ल्ड कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज या दोन्ही इंडेक्सवर सूचीबद्ध होणार आहेत. सेलो वर्ल्ड या कंपनीचे शेअर्स 9 नोव्हेंबर 2023 रोजी सूचीबद्ध केले जाणार आहेत.

सेलो वर्ल्ड कंपनी IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना 6 नोव्हेंबर 2023 रोजी शेअर्स वाटप करेल. किरकोळ गुंतवणूकदारांना या कंपनीच्या IPO मध्ये किमान 1 आणि कमाल 13 लॉट खरेदी करण्याची मुभा देण्यात आली आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना सेलो वर्ल्ड कंपनीचा 1 लॉट खरेदी करण्यासाठी 14904 रुपये जमा करावे लागतील.

13 लॉट खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांना 193,752 रुपये जमा करावे लागणार आहे. सेलो वर्ल्ड कंपनीच्या शेअर्सचे दर्शनी मूल्य 5 रुपये आहे. कंपनीने आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांना प्रति शेअर 61 रुपये सुट देखील जाहीर केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Cello World IPO Stock GMP today on 26 October 2023.

हॅशटॅग्स

Cello World IPO(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x