17 May 2024 12:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | टेन्शन वाढलं! आज सोन्याचा भाव अजून महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या My EPF Money | पगारदारांनो! तुमच्या खात्यातही पैसे जमा झाले असतील तर पटापट तपासून घ्या, नियम बदलला Shukra Rashi Parivartan | 'या' 3 नशीबवान राशीत तुमची राशी आहे का? शुक्र राशी परिवर्तन ठरणार अत्यंत भाग्यशाली SBI Mutual Fund | पगारदारांनो! या खास योजना तुम्हाला अल्पावधीत 22 लाख रुपयेपर्यंत परतावा देतील, यादी सेव्ह करा Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा
x

Multibagger Stocks | एका आठवड्यात 20 टक्के परतावा दिला एचएमए अॅग्रो इंडस्ट्रीज शेअरने, पुढे किती तेजी?

Multibagger Stocks

Multibagger Stocks | एचएमए अॅग्रो इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. मात्र बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजार विक्रीच्या दबावात असताना एचएमए अॅग्रो इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 2.54 टक्क्यांच्या घसरणीसह 684 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. एचएमए अॅग्रो इंडस्ट्रीज कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3430 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 840 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 565 रुपये होती.

मागील 5 दिवसात एचएमए अॅग्रो इंडस्ट्रीज कंकणीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 3.64 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. मागील 1 महिन्यात HMA ऍग्रो इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरची किंमत 5 टक्के कमजोर झाली होती. मागील 6 महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 19 टक्के वाढली आहे. आज शुक्रवार दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी एचएमए अॅग्रो इंडस्ट्रीज स्टॉक 3.63 तक्के वाढीसह 697 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

मागील आठवड्यात शुक्रवारी एचएमए अॅग्रो इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 580 रुपये या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून हा स्टॉक आतापर्यंत 20 टक्के मजबूत झाला आहे. एचएमए अॅग्रो कंपनीने सेबीला कळवले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 8 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीत चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे आणि चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीचे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. यासोबतच कंपनीचे संचालक मंडळ स्टॉक स्प्लिटबाबत देखील चर्चा करू शकतात.

एचएमए अॅग्रो इंडस्ट्रीज ही कंपनी मुख्यतः प्रथिने, बासमती तांदूळ, फ्रोझन फिश, रेंडर केलेले आणि पाळीव प्राण्यांचे अन्न आणि फळे आणि भाज्या पुरवण्याचे काम करते. वार्षिक महसुलाच्या बाबतीत, एचएमए ऍग्रो इंडस्ट्रीज कंपनी भारतातील तिसरी सर्वात मोठी निर्यातदार कंपनी मानली जाते. भारत सरकारने एचएमए ऍग्रो कंपनीला स्टार एक्सपोर्ट हाऊसचा दर्जा बहाल केला आहे. एचएमए ऍग्रो कंपनीची उत्पादने जगभरातील विविध 40 देशांमध्ये ब्लॅक गोल्ड, कामिल आणि एचएमए या ब्रँड नावाने प्रसिद्ध आहे.

मागील आर्थिक वर्षाच्या मार्च 2022 तिमाहीत एचएमए अॅग्रो इंडस्ट्रीज कंपनीने 880 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीचा निव्वळ नफा मागील तिमाहीत 26.9 कोटी रुपये नोंदवला गेला होता. जो आता 46.9 कोटी रुपयेवर पोहचला आहे. आर्थिक वर्षाच्या मार्च तिमाहीत या कंपनीने 35 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. एचएमए अॅग्रो इंडस्ट्रीज कंपनीच्या निव्वळ नफ्यात तिमाही दर तिमाही आधारावर 175 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks for investment 27 October 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(445)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x