18 May 2024 1:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL स्टॉकमध्ये तुफान तेजी, शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने धावतोय, फायदा घेणार? Wipro Share Price | विप्रो स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआऊटचे संकेत, मोठी कमाई होणार, टार्गेट प्राइस जाणून घ्या Ashok Leyland Share Price | मालामाल करणाऱ्या स्टॉकच्या खरेदीला ऑनलाईन गर्दी, तज्ज्ञांचा शेअर्स खरेदीचा सल्ला Infosys Share Price | इन्फोसिस शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक स्वस्तात विकत घ्यावा? Hold करावा की Sell करावा? Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR करताना 'या' 10 चुका टाळा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा Post Office Interest Rate | तुमच्या कुटुंबासाठी 'या' 3 पोस्ट ऑफिस योजना वरदान ठरतील, फायदे जाणून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांसाठी खास SIP योजना नोट करा, महिना बचत देईल 1 कोटी 4 लाख रुपये परतावा
x

Brightcom Share Price | अनेकांना श्रीमंत बनवणारा पेनी शेअर पुन्हा तेजीत! 16 रुपयांच्या ब्राइटकॉम गृप शेअर्स खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी

Brightcom Share Price

Brightcom Share Price | शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार शंकर शर्मा यांची गुंतवणूक असलेल्या ब्राइटकॉम गृपच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून ब्राइटकॉम गृप कंपनीचे बॅक टू बॅक अप्पर सर्किट हीट करत आहेत. आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे.

2010 साली स्थापन झालेली ब्राइटकॉम ग्रुप कंपनी अत्याधुनिक डिजिटल मार्केटिंग सोल्यूशन्स सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. या कंपनीचा ग्राहक वर्ग जगभरात पसरला आहे. आज मंगळवार दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी ब्राइटकॉम गृप स्टॉक 2.80 टक्के वाढीसह 16.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ब्राइटकॉम गृपचे स्वतंत्र संचालक निलेंदू नारायण चक्रवर्ती यांनी 20 ऑक्टोबर 2026 रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची बातमी आली होती. त्यानंतर ब्राइटकॉम गृप कंपनीचे शेअर्स तेजीत वाढायला सुरुवात झाली आहे. ऑगस्ट 2023 मध्ये ब्राइटकॉम ग्रुपच्या शेअर 22.98 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

मागील काही महिन्यांपूर्वी सेबीने ब्राइटकॉम गृप कंपनीच्या आर्थिक व्यवहार आणि शेअरमधील असामान्य उलाढाल यामुळे कंपनीवर कारवाईचा बडगा देखील उगारला होता. त्यामुळे कंपनीच्या शेअरमध्ये सातत्याने पडझड पाहायला मिळत होती.

आता सेबीने जारी केलेल्या नवीन आदेशानुसार ब्राइटकॉम गृप कंपनीचे प्रवर्तक आणि सीएमडी सुरेश कुमार रेड्डी आणि मुख्य वित्तीय अधिकारी नारायण राजू यांना सेबीने पुढील आदेशापर्यंत कोणत्याही सूचीबद्ध कंपनीमध्ये संचालक पदावर काम करण्यास बंदी घातली आहे. याशिवाय रेड्डी आणि राजू पुढील आदेशापर्यंत शेअर बाजारात कोणतेही व्यापार करण्यास पात्र असणार नाही.

शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार शंकर शर्मा आणि 21 इतर व्यक्तीना सेबीने पुढील सूचना मिळेपर्यंत शेअर्स विकण्यास बंदी घातली आहे. शंकर शर्मा यांनी मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट X वर एका पोस्टद्वारे स्पष्टीकरण दिले आहे की, त्यांनी सेबीकडे संबंधित प्रकरणाचा सर्व डेटा सादर केला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Brightcom Share Price today on 31 October 2023

हॅशटॅग्स

Brightcom Share Price(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x