17 May 2024 2:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | अबब! जबरदस्त म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 9.57 कोटी रुपये परतावा दिला Gold Rate Today | टेन्शन वाढलं! आज सोन्याचा भाव अजून महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या My EPF Money | पगारदारांनो! तुमच्या खात्यातही पैसे जमा झाले असतील तर पटापट तपासून घ्या, नियम बदलला Shukra Rashi Parivartan | 'या' 3 नशीबवान राशीत तुमची राशी आहे का? शुक्र राशी परिवर्तन ठरणार अत्यंत भाग्यशाली SBI Mutual Fund | पगारदारांनो! या खास योजना तुम्हाला अल्पावधीत 22 लाख रुपयेपर्यंत परतावा देतील, यादी सेव्ह करा Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली
x

Advik Capital Share Price | चिल्लरने श्रीमंत व्हा! एका वडापावच्या किंमतीत 8 शेअर्स खरेदी करा, 2 रुपयाचा पेनी शेअर आयुष्यं बदलू शकतो

Advik Capital Share Price

Advik Capital Share Price | अॅडविक कॅपिटल कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अॅडविक कॅपिटल कंपनीचे शेअर्स 1 टक्के वाढीसह 2.46 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. अॅडविक कॅपिटल कंपनीचे एकूण बाजार भांडवल 105 कोटी रुपये आहे.

या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 5 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 1.90 रुपये होती 4 नोव्हेंबर 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 28 पैशांवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 8 नोव्हेंबर 2023 रोजी अॅडविक कॅपिटल स्टॉक 2.83 टक्के वाढीसह 2.54 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या काळात कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 900 टक्के नफा कमावून दिला आहे.

अॅडविक कॅपिटल लिमिटेड कंपनीने सेबीला माहितीत कळवले आहे की, कंपनीने एक मालमत्ता पुनर्रचना कंपनी ताब्यात घेण्याचा विचार केला आहे. या माध्यमातून अॅडविक कॅपिटल कंपनीने मालमत्ता पुनर्बांधणीच्या व्यवसायात प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत.

अॅडविक कॅपिटल कंपनीने आपल्या कामकाजात विविधता आणण्यासाठी आधुनिक काळातील व्यवसायात प्रवेश करण्याची योजना आखली आहे. अॅडविक कॅपिटल कंपनीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला नोंदणीकृत मालमत्ता पुनर्रचना कंपनी विकत घेण्याचा निर्णय कळवला आहे. आणि या मालमत्ता पुनर्रचना कंपनीला विविध सार्वजनिक बँकांचे समर्थन प्राप्त झाले आहे.

सध्या भारतात एकूण 29 ARC कंपन्या व्यवसाय करत आहेत. अॅडविक कॅपिटल जी कंपनी खरेदी करणार आहे, ही या 29 कंपन्यांमधील एक कंपनी आहे. ही कंपनी वित्तीय क्षेत्रात एनपीए कमी करण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी नाविन्यपूर्ण रिझोल्यूशन मेकॅनिझमद्वारे काम करते. यामुळे एमएसएमई क्षेत्राला बँकांकडून दिल्या जाणाऱ्या कर्जाचे प्रमाण वाढण्यास मदत होऊ शकते.

कोरोना महामारीनंतर भारतीय शेअर बाजारात आलेल्या तेजीमुळे अनेक लहान कंपन्यांचे शेअर्स मल्टीबॅगर स्टॉक म्हणून नावारूपाला आले. अशा कंपन्यांनी अवघ्या 2 वर्षांच्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे.

भारतीय शेअर बाजारात मल्टीबॅगर स्टॉक्समध्ये फक्त मोठ्या कंपन्यांचे शेअर्स नाहीत, ते अनेक पेनी स्टॉक कंपन्यां देखील सामील आहेत. अॅडविक कॅपिटल कंपनीच्या शेअरने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना बंपर नफा कमावून दिला आहे. या काळात कंपनीचे शेअर्स 28 पैशावरून वाढून 5 रुपये किमतीवर पोहचले आहेत.

काही मीडिया रिपोर्ट नुसार अॅडविक कॅपिटल कंपनीने सप्टेंबर 2023 मध्ये 50 कोटीचे राइट्स इश्यू करण्याची योजना आखली होती. अॅडविक कॅपिटल कंपनीचे हे राइट्स इश्यू पूर्ण पेड अप असतील. कंपनी 1 रुपये दर्शनी मूल्याचे 20.79 कोटी शेअर्स राइट्स इश्यू अंतर्गत जारी करून 49.91 कोटी रुपये भांडवल उभारणी करणार आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Advik Capital Share Price BSE 08 November 2023.

हॅशटॅग्स

#Advik Capital Share Price(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x