21 May 2024 3:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Servotech Share Price | श्रीमंत बनवतोय हा शेअर! अवघ्या 3 वर्षात दिला 3270% परतावा, आली फायद्याची अपडेट Avanti Feeds Share Price | 1 रुपयाच्या शेअरने करोडपती बनवलं, मालामाल करणारा शेअर खरेदी करा Reliance Power Share Price | 26 रुपयाचा रिलायन्स पॉवर शेअर खिसा पैशाने भरतोय, स्टॉकची जोरदार खरेदी IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी मिळेल मल्टिबॅगर परतावा, अशी संधी सोडू नका Infosys Share Price | कमाईची संधी सोडू नका! Infosys आणि TCS सहित हे 7 शेअर्स मजबूत परतावा देणार Hot Stocks | पैशाचा पाऊस पाडणारे 9 स्वस्त पेनी शेअर्स, अवघ्या 5 दिवसात 82 टक्केपर्यंत परतावा मिळतोय Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल मजबूत परतावा
x

Multibagger Stocks | मार्ग श्रीमंतीचा! बिर्ला कॉर्पोरेशन शेअरचे गुंतवणूकदार करोडपती झाले, दिला 9979 टक्के परतावा

Multibagger Stocks

Multibagger Stocks | बिर्ला कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. 20 वर्षांपूर्वी ज्या लोकांनी बिर्ला कॉर्पोरेशन स्टॉक खरेदी केला होता, ते लोक आता करोडपती झाले आहेत. मार्च 2023 पासून या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 44 टक्के परतावा कमावून दिला आहे.

एचडीएफसी सिक्युरिटीजने बिर्ला कॉर्पोरेशनम कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 10 नोव्हेंबर रोजी या कंपनीचे शेअर्स 1,275.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 28 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 33 टक्के नफा मिळवून दिला आहे. तर मागील 20 वर्षांत या कंपनीच्या शेअरची किंमत 9979 टक्के वाढली आहे.

आज सोमवार दिनांक 13 नोव्हेंबर 2023 रोजी बिर्ला कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स 0.57 टक्के घसरणीसह 1,277.90 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत बिर्ला कॉर्पोरेशन कंपनीची व्हॉल्यूम वाढ वार्षिक आधारावर 15 टक्के नोंदवली गेली होती. कंपनीचा युनिट EBITDA देखील तिमाही आधारावर 20 रुपये प्रति मेट्रिक टन वाढीसह 678 रुपये प्रति मेट्रिक टनवर पोहचला आहे. बिर्ला कॉर्पोरेशन कंपनीने उत्तर आणि मध्य भारतात आपले मजबूत अस्तित्व निर्माण केले आहे.

सप्टेंबर तिमाहीच्या पार्श्वभूमीवर HDFC सिक्युरिटीज फर्म बिर्ला कॉर्पोरेशन स्टॉकबाबत उत्साही पाहायला मिळत आहे. तज्ज्ञांनी या कंपनीच्या शेअरवर 1465 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. ही लक्ष्य किंमत शेअरच्या सध्याच्या किमतीच्या तुलनेत 15 टक्के अधिक आहे. बिर्ला कॉर्पोरेशन स्टॉक 28 मार्च 2003 रोजी 12.65 रुपये किमतीवर ट्रेड मार होता. जर तुम्ही 2003 मध्ये बिर्ला कॉर्पोरेशन स्टॉकमध्ये एक लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 10079051 रुपये झाले असते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks Birla Corporation Share Price NSE 13 November 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(445)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x