21 May 2024 10:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Demat Account | शेअर्स गुंतवणूकदारांसाठी अलर्ट, ट्रान्झॅक्शन चार्जेससहित डीमॅट खात्याशी संबंधित नियमात बदल ICICI Mutual Fund | पगारदारांना मालामाल बनवणारी म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 35 लाख रुपये परतावा Numerology Horoscope | 21 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 21 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल?
x

Jio Financial Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअर्समध्ये जोरदार खरेदी सुरू, सध्याच्या किमतीवर किती फायदा होईल?

Jio Financial Share Price

Jio Financial Share Price | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीबाबत मोठी अपडेट आली आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने आपल्या पहिल्या बाँड इश्यू संदर्भात मर्चंट बँकर्ससोबत प्राथमिक बोलणी सुरू केली आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2 टक्क्यांच्या घसरणीसह 215.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 278.20 रुपये होती. तर आज मंगळवार दिनांक 21 नोव्हेंबर 2023 रोजी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस स्टॉक 1.93 टक्के वाढीसह 219.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी बाँड इश्यूद्वारे 10,000 कोटी रुपये भांडवल उभारणी करणार आहे. चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे बाँड बाजारात लाँच होऊ शकतात. मर्चंट बँकर्सनी दिलेल्या माहितीनुसार जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनी सध्या क्रेडिट रेटिंग आणि इतर आवश्यक मंजूरी मिळविण्याचा प्रयत्न करत आहे.

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी वित्तीय बाजारात आपला दबदबा वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 21 ऑगस्ट 2023 रोजी 265 रुपये किमतीवर शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आले होते. त्याच वेळी हा स्टॉक NSE इंडेक्सवर 262 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला होता.

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ही कंपनी मुख्यतः आपल्या ग्राहकांना ऑटो, होम लोन आणि इतर वित्तीय सेवा प्रदान करण्याचे काम करत. तज्ञांच्या मते कंपनीच्या प्रवर्तकानी कंपनीचे मोठे भाग भांडवल धारण केले आहेत. या कंपनीला दिग्गज संस्थांनी AAA क्रेडिट रेटिंग दिली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी भांडवल उभारणी केली होती. आज या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. फायदा घेण्यासाठी तुम्ही या कंपनीचे शेअर्स खरेदी करू शकता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Jio Financial Share Price NSE 21 November 2023.

हॅशटॅग्स

Jio Financial Share Price(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x