17 May 2024 3:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया स्टॉक 'हाय रिस्क' वर, तज्ज्ञांचा Sell करण्याचा सल्ला, किती घसरणार? IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, संधी सोडू नका Rajnish Retail Share Price | अवघ्या 63 पैशाचा शेअर! 4 वर्षात दिला 14000% परतावा, स्टॉक आजही स्वस्त आणि फायद्याचा Suzlon Share Price | सुझलॉन स्टॉक ब्रेकआऊट लेव्हल अपडेट, शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा सल्ला काय? IREDA Share Price | तज्ज्ञांचा IREDA शेअर्स 'Hold' चा सल्ला, या प्राईसवर मजबूत सपोर्ट, पुढची टार्गेट प्राईस जाहीर HDFC Mutual Fund | अबब! जबरदस्त म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 9.57 कोटी रुपये परतावा दिला Gold Rate Today | टेन्शन वाढलं! आज सोन्याचा भाव अजून महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

Rattanindia Enterprises Share Price | पैशाची गाडी सुसाट! मागील 1 महिन्यात या शेअरने गुंतवणूकदारांना 60% परतावा दिला

Rattanindia Enterprises Share Price

Rattanindia Enterprises Share Price | मागील काही दिवसापासून रतन इंडिया एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. रतन इंडिया एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीचे शेअर्स शुक्रवारी अल्पावधीत 20 टक्के वाढले आहेत. मागील 5 दिवसात रतन इंडिया कंपनीच्या शेअर्सची किंमत 63 रुपयेवरून वाढून 78.40 रुपये किमतीवर पोहचली आहे.

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रतन इंडिया एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.61 टक्क्यांच्या वाढीसह 78.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 24 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.50 टक्के वाढीसह 77.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

रतन इंडिया एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 10,920 कोटी रुपये आहे. रतन इंडिया एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 81.5 रुपये होती. तर नीचांक परकी किंमत 32.35 रुपये होती. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 60 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 105 टक्के परतावा कमावून दिला आहे.

रतन इंडिया एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, या कंपनीच्या सहयोगी उपकंपनी निओ ब्रँडने कॅज्युअल फॅशन ब्रँड लॉन्च केले आहे. रतन इंडिया कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, रतन इंडिया एंटरप्रायझेस लिमिटेड कंपनीच्या 100 टक्के मालकीची उपकंपनी असलेल्या निओ ब्रँड कंपनीने आपला कॅज्युअल फॅशन ब्रँड लॉन्च केला आहे. या कंपनीने आपले नवीन क्लोदिंग कलेक्शन Amazon ऑनलाईन शॉपिंग साईटवर लाँच केले आहे.

रतन इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 150 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग सरासरी किमतीच्या वर ट्रेड करत आहेत. रतन इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरचा 14 दिवसांचा RSI 79.85 अंकावर आहे. तज्ञांनी रतन इंडिया एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 85 रुपये लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी स्टॉकवर 68 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सलाला दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Rattanindia Enterprises Share Price NSE 25 November 2023.

हॅशटॅग्स

RattanIndia Enterprises Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x