18 May 2024 1:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, टॉप 10 पेनी स्टॉकची यादी सेव्ह करा Vodafone Idea Share Price | 13 रुपयाचा स्टॉक हाय रिस्क, हाय रिवॉर्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी शेअरबाबत मोठे संकेत दिले RVNL Share Price | RVNL स्टॉकमध्ये तुफान तेजी, शेअर बुलेट ट्रेनच्या गतीने धावतोय, फायदा घेणार? Wipro Share Price | विप्रो स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआऊटचे संकेत, मोठी कमाई होणार, टार्गेट प्राइस जाणून घ्या Ashok Leyland Share Price | मालामाल करणाऱ्या स्टॉकच्या खरेदीला ऑनलाईन गर्दी, तज्ज्ञांचा शेअर्स खरेदीचा सल्ला Infosys Share Price | इन्फोसिस शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक स्वस्तात विकत घ्यावा? Hold करावा की Sell करावा? Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR करताना 'या' 10 चुका टाळा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा
x

DB Realty Share Price | डीबी रियल्टी शेअर्स गुंतवणुकदारांना मालामाल करणार, शेअर्स तेजीचं नेमकं कारण काय?

DB Realty Share Price

DB Realty Share Price | डीबी रियल्टी कंपनीच्या प्रवर्तकांनी आपल्या भाग भांडवलातील सुमारे तीन टक्के वाटा 301 कोटी रुपये किमतीला विकला आहे. कंपनीवरील कर्जाची परतफेड करण्यासाठी कंपनीच्या प्रवर्तकांनी आपले शेअर्स विकण्याचा निर्णय घेतला होता.

मुंबई स्थित डीबी रियल्टी कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, कंपनीच्या प्रवर्तक समूहाने कंपनीचे 1.46 कोटी शेअर्स म्हणजेच जवळपास 2.91 टक्के भाग भांडवल विकून 301 कोटी रुपये जमा केले आहेत. या पैशाचा वापर कंपनी आपले कर्ज फेडण्यासाठी करणार आहे.

मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये डीबी रियल्टी कंपनीचे शेअर्स 3.42 टक्के वाढीसह 211.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. बुधवारी हा शेअर 2.83% वाढीसह 212.40 रुपयांवर ट्रेड करत होता. डीबी रियल्टी कंपनीच्या प्रवर्तक गटाने संबंधित व्यवहार आणि असुरक्षित व्याजमुक्त कर्जाची परतफेड करण्यासाठी कंपनीच्या उत्पन्नाचा मोठा भाग खर्च केला आहे. डीबी रियल्टी कंपनी या फंडाच्या माध्यमातून आपले संपूर्ण कर्ज फेडून कर्जमुक्त होऊ इच्छित आहे. 30 नोव्हेंबर 2023 किंवा त्यापूर्वी डीबी रियल्टी कंपनी पूर्णपणे कर्जमुक्त होईल, अशी माहिती कंपनीने दिली आहे.

डीबी रियल्टी कंपनीने 2028 पर्यंत मुंबई CBD मध्ये 2.00 दशलक्ष चौरस फुटांपेक्षा अधिक प्राइम लीजबल ऑफिस स्पेस मिळण्याचे लक्ष निर्धारित केले आहे. डीबी रियल्टी ही कंपनी भारतातील टॉप रियल्टी कंपनीपैकी एक आहे. ही कंपनी इक्विटी बेस आणि मार्केट कॅपवर आधारित भारतातील टॉप 10 रिअल इस्टेट कंपन्याच्या यादीत येते. कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीच्या कमाईचा मोठा वाटा कर्जाची परतफेड करण्यासाठी खर्च केला आहे. असे कंपनीने स्टॉक नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | DB Realty Share Price NSE 29 November 2023.

हॅशटॅग्स

DB Realty Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x