18 May 2024 12:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | मालामाल करणाऱ्या स्टॉकच्या खरेदीला ऑनलाईन गर्दी, तज्ज्ञांचा शेअर्स खरेदीचा सल्ला Infosys Share Price | इन्फोसिस शेअरबाबत मोठी अपडेट, स्टॉक स्वस्तात विकत घ्यावा? Hold करावा की Sell करावा? Income Tax on Salary | नोकरदारांनो! ITR करताना 'या' 10 चुका टाळा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा Post Office Interest Rate | तुमच्या कुटुंबासाठी 'या' 3 पोस्ट ऑफिस योजना वरदान ठरतील, फायदे जाणून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांसाठी खास SIP योजना नोट करा, महिना बचत देईल 1 कोटी 4 लाख रुपये परतावा Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 18 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या
x

Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्स उच्चांकी पातळीवर, जोरदार खरेदी वाढली, गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या

Tata Power Share Price

Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. मागील काही महिन्यापासून टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स गुंतवणुकदारांचे पैसे गुणाकार करत आहेत. वास्तविक टाटा पॉवर कंपनीने बिकानेर-नीमराना ट्रान्समिशन एनर्जी प्रकल्पाचे अधिग्रहण केले आहे.

टाटा पॉवर कंपनीने बिकानेर-3 नीमराना-2 ट्रान्समिशन हा प्रकल्प स्पेशल पर्पज व्हेईकलद्वारे ताब्यात घेतले आहे. हे युनिट पीएफसी कन्सल्टिंग कंपनीने स्थापन केले होते. टाटा पॉवर कंपनीने आपल्या निवेदनात माहिती दिली की, भारतात अक्षय ऊर्जा ट्रान्समिशन पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी कंपनीने हे अधिग्रहण केले आहे. आज सोमवार दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी टाटा पॉवर स्टॉक 1.70 टक्के वाढीसह 280.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

केंद्रीय उर्जा मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार टॅरिफ आधारित स्पर्धात्मक बोली प्रक्रियेत यशस्वीपणे बोली लावल्यानंतर टाटा पॉवर कंपनीला इरादा पत्र इश्यू करण्यात आले. टाटा पॉवर कंपनी हा प्रकल्प बांधा, स्वतः चालवा आणि सुपूर्द करा, म्हणजेच BOT या तत्त्वावर विकसित करणार आहे.

यासह टाटा पॉवर कंपनी राजस्थान राज्यातील बिकानेर संकुलातून 7,700 मेगावॅट अक्षय ऊर्जा निर्माण करण्याचे लक्ष निर्धारित केले आहे. बिकानेर-3 पूलिंग स्टेशन ते नीमराना 2 सबस्टेशनपर्यंत 340 किमी लांबीच्या ट्रान्समिशन कॉरिडॉरची स्थापना करण्याचे काम देखील या प्रकल्पात प्रस्तावित आहे.

टाटा पॉवर कंपनी पुढील 35 वर्षे या पारेषण प्रकल्पाचे देखभाल करणार आहे. याचे अंदाजे मूल्य 1,544 कोटी रुपये आहे. टाटा पॉवर कंपनीला स्पेशल पर्पज व्हेईकलच्या हस्तांतरण केल्याच्या तारखेपासून 24 महिन्यांच्या आत हा प्रकल्प कार्यान्वित करण्याची मुदत देण्यात आली आहे.

आज टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 280 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 278.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सध्या टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक पातळीवर ट्रेड करत आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Power Share Price NSE 04 December 2023.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(84)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x