15 May 2024 5:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सच्या किंमतीत वादळ येणार! गुंतवणुकदारांना करोडपती बनवणार हा स्वस्त शेअर, बातमी काय?

Suzlon Share Price

Suzlon Share Price | जगातील सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापक ब्लॅक रॉक कंपनीने भारतीय पवन ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या सुझलॉन एनर्जी कंपनीचे 68 कोटी शेअर्स धारण केले आहेत. सुझलॉन एनर्जी ही भारतातील पवन ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणारी दिग्गज कंपनी आहे. सुझलॉन एनर्जी कंपनी पूर्णतः कर्जमुक्त आहे. सध्या या कंपनीकडे 1613 मेगावॅट क्षमतेच्या ऑर्डर प्रलंबित आहेत.

सध्या भारतीय शेअर बाजारात कमालीची तेजी पाहायला मिळत आहे. मात्र आज सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. आज मंगळवार दिनांक 5 डिसेंबर 2023 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 0.62 टक्के घसरणीसह 39.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुझलॉन एनर्जी स्टॉक 2 टक्क्यांच्या वाढीसह 40.01 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 54440 कोटी रुपये आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 12 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत सुझलॉन एनर्जी स्टॉक 252 टक्के वाढला आहे. 2023 या वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 275 टक्के नफा कमावून दिला आहे.

मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना 301 टक्के नफा मिळवून दिला आहे. 27 डिसेंबर 2019 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 1.79 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीच्या तुलनेत सुझलॉन एनर्जी स्टॉक सध्या 2000 टक्क्यांपेक्षा जास्त मजबूत झाला आहे.

तज्ज्ञांच्या मते, सध्या जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुम्ही सुझलॉन एनर्जी स्टॉक खरेदी करू शकतात. जगातील सर्वात मोठी मालमत्ता व्यवस्थापक कंपनी ब्लॅकरॉकने सुझलॉन एनर्जी कंपनीचे 5.01 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. नोव्हेंबर 2023 मध्ये ब्लॅकरॉक कंपनीने सुझलॉन एनर्जी कंपनीचे 24.5 लाख शेअर्स खरेदी केले होते.

सुझलॉन एनर्जीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे एकूण 13.29 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीकडे सध्या 1.6 GW च्या क्षमतेची ऑर्डर प्रलंबित आहे. सुझलॉन एनर्जी कंपनी पूर्णपणे कर्जमुक्त झाली असून, कंपनीकडे सध्या 600 कोटी रुपये कॅश शिल्लक आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price NSE 05 December 2023.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(138)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x