19 May 2024 6:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 19 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | तज्ज्ञांकडून PSU BEL शेअरला 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 700% परतावा, खरेदीला ऑनलाईन गर्दी Bonus Shares | पटापट मल्टिबॅगर परतावा देतोय हा शेअर, फ्री बोनस शेअर्स जाहीर, संधी सोडू नका Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी 245% परतावा दिला Malavya Raj Yog | मालव्य राजयोग 'या' 5 राशींच्या लोकांना मालामाल करणार, लाभस्थानी शुक्र ठरणार वरदान Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी L&T Share Price | L&T कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी, वेळीच एंट्री घ्या
x

LIC Share Price | 2 महिन्यात 32% परतावा देणाऱ्या LIC शेअर्समध्ये पुढे फायदा होईल की नाही? तज्ज्ञांनी दिले संकेत

LIC Share Price

LIC Share Price | भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसी कंपनीने 5 लाख कोटी रुपये बाजार भांडवल स्पर्श केले आहे. जून 2022 नंतर पुन्हा एकदा एलआयसी कंपनीने 5 लाख कोटी रुपये बाजार मूल्याचा टप्पा ओलांडला आहे. एलआयसी कंपनीचे शेअर्स मागील वर्षी मे 2022 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते.

सूचीबद्ध झाल्यानंतर एलआयसी स्टॉकमध्ये तीव्र घसरण पहायला मिळाली आणि कंपनीचे शेअर्स बाजार भांडवल बरेच कमी झाले होते. आता एलआयसी कंपनीने पुन्हा एकदा बाजार भांडवलाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठी सरकारी कंपनी असण्याचा मान मिळवला आहे. आज शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी एलआयसी स्टॉक 1.61 टक्के घसरणीसह 772.80 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एलआयसी कंपनीचे शेअर्स 7 टक्के वाढीसह 800 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एलआयसी स्टॉक 5 टक्के वाढीसह आणि सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 7.2 टक्के वाढीसह ट्रेड करत होता. नोव्हेंबर 2023 पासून आतापर्यंत एलआयसी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 32 टक्के परतावा कमावून दिला आहे.

LIC कंपनीचे शेअर्स अद्याप 949 रुपये या आपल्या IPO किमतीपासून 16 टक्के खाली ट्रेड करत आहेत. सूचीबद्ध झाल्यापासुन एलआयसी कंपनीचे शेअर्स IPO किंमतीवर पोहचले नाहीये. नोव्हेंबर 2023 मध्ये एलआयसी कंपनीच्या प्रीमियम कलेक्शनमध्ये देखील 33 टक्के घट नोंदवली गेली होती. तर कंपनीचे वैयक्तिक वार्षिक प्रीमियम समतुल्य मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 9 टक्के कमी नोंदवले गेले आहे.

ब्रोकरेज फर्म कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, एलआयसी कंपनीच्या शेअरमध्ये नुकताच लाँच करण्यात आलेल्या ‘जीवन उत्सव’ योजनेमुळे तेजी पाहायला मिळत आहे. एलआयसी कंपनीकडे एक मजबूत मार्केटिंग एजन्सी आहे. कंपनीची टीम नॉन इक्वलंट पॉलिसी विकण्यास देखील सक्षम आहे. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मने आपल्या अहवालात एलआयसी कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 1,040 रुपये किंमत स्पर्श करू शकतात.

आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या सहामाहीत एलआयसी कंपनीचा नवीन व्यवसाय प्रीमियम मागील वर्षीच्या 24,535 कोटी रुपयेच्या तुलनेत 2.7 टक्के वाढून 25,184 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये एलआयसी कंपनीचे नवीन व्यवसाय प्रीमियम 6.9 टक्के वाढले आहेत.

एलआयसी कंपनीने नवीन विमा सेक्टरमधील 49 टक्के वाटा काबीज केला आहे. 2024 मध्ये या कंपनीचा नवीन व्यवसाय प्रीमियम योगदान 96 टक्के वाढण्याचा अंदाज आहे. LIC स्टॉकचा मागोवा घेणाऱ्या 19 पैकी 15 तज्ञ एलआयसी स्टॉक खरेदीबाबत सकारात्मक आहेत. आणि तीन तज्ञांनी एलआयसी कंपनीचे शेअर्स ‘होल्ड’ करण्याची शिफारस केली आहे. मात्र एका तज्ञाने स्टॉक तत्काळ विकण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | LIC Share Price NSE 08 December 2023.

हॅशटॅग्स

#LIC Share Price(99)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x